गोव्यात गॅस दरवाढीचा जनतेला चटका; घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महागला

महागाईत भर ; 14.2 किलोचे एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी, तर पाच किलोचे छोटे सिलिंडर 18 रुपयांनी महागले आहे.
LPG Gas Cylinder
LPG Gas Cylinder Dainik Gomantak

गंगाराम आवणे

पणजी : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरांत आज वाढ करण्यात आली असून 14.2 किलोचे एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी, तर पाच किलोचे छोटे सिलिंडर 18 रुपयांनी महागले आहे. यामुळे पणजीमध्ये ग्राहकांना एका सिलिंडरसाठी आता 1,067 रुपये मोजावे लागणार आहेत. व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलिंडरच्या किमती साडेआठ रुपयांनी घटवून केंद्र सरकारने व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

जगात सर्वात महाग गॅस जनतेला जगातील सर्वात महाग एलपीजी गॅस खरेदी करावा लागत आहे. मोदी सरकारमुळे महागाईचा आलेख वाढतच आहे. ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा’ हा केंद्र सरकारचा नवा नारा बनल्याची टीका काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी केली.

(Gas price hike hits in goa)

LPG Gas Cylinder
गोमंतकीय जनतेच्या तक्रारीसाठी नवे पोर्टल

राज्यात महागाईचा भस्मासूर वाढतच चालला आहे. डिझेल, पेट्रोल, दूध, कडधान्ये आणि ता पुन्हा घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रूपयांनी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल 154 रूपयांनी सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. 17 टक्‍क्यांनी सिलिंडरचा दर वाढल्‍याने या महागाईच्या भडक्यात मध्यमवर्गीय तसेच गोरगरीब जनता होरपळत आहे.

महागाई वाढीमुळे राज्यातील जनतेसोबतच विरोधी पक्ष देखील आक्रमकतेच्या पावित्र्यात आहेत. एकीकडे सरकार वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा करते, तर दुसरीकडे दरात वाढ करते. सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा रोष सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे.

3 घरगुती मोफत सिलिंडर कधी ?

राज्यातील विद्यमान सरकारने आपल्या जाहिरनाम्यात 3 मोफत सिलेंडर देण्याचे आश्‍वासन दिले होते. जनतेने मतदान करून सरकारला सत्तेतही बसवले या सरकारने 100 दिवस देखील पूर्ण केले मात्र अजुनही ही योजना लागू केलेली नाही. पूर्वी कुणाला हे मोफत सिलेंडर देणार ते ठरले नव्हते मात्र आता बी.पी.एल कार्डधारकांना देण्याचे ठरले आहे त्यानुसार राज्यातील बी.पी.एल कार्डधारक आपल्याला वर्षाला ३ मोफत सिलेंडर कधी मिळणार या प्रतिक्षेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com