गोव्याच्या बीचना बिअर बाटल्यांचे ग्रहण

राज्यातील समुद्रकिनारे, नद्या आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांवर पर्यटक निष्काळजीपणे बिअरच्या बाटल्या तसेच कचरा टाकुन जातात
Goa Beach
Goa BeachDainik Gomantak

पणजी: राज्यातील समुद्रकिनारे, नद्या आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांवर पर्यटक निष्काळजीपणे बिअरच्या बाटल्या तसेच कचरा टाकुन जातात, याचमुळे बीच वर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यावर तोडगा म्हणुन ‘बीअर बॉटल प्रोजेक्ट’ हा एक शाश्वत उपक्रम हळूहळू नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. (Garbage of beer bottles on the beach of Goa)

Goa Beach
म्हापसा शहर दुर्गंधीच्या विळख्यात

सध्या, वापरलेल्या बिअरच्या बाटल्यांवर प्रक्रिया करणारी यंत्रणा आणि काचेच्या कचरा पुनर्वापरासाठी प्रोत्साहन नसल्यामुळे, लाखो वापरलेल्या बिअरच्या बाटल्या तश्याच पडुन राहतात, त्यांना कोणीही घेत नाही, आणि म्हणुनच गोव्याच्या जलद-विकसनशील किनारपट्टीच्या भागात हा कचरा (Garbage Problem) वाढतच चालला आहे.

सेन्सिबल अर्थच्या प्रवक्त्या जेरुशा डिसोझा, साल्वाडोर डू मुंडो-आधारित सेंटर फॉर सस्टेनेबिलिटीच्या मते, 'बीअर बॉटल प्रोजेक्ट'चे उद्दिष्ट गोव्यातील काचेच्या बिअरच्या बाटल्यांचा वापर कमी करण्यासाठी तसेच कचरा वेचकांना प्रोत्साहन देऊन, स्थानिकांशी सहकार्य करून बिअर कंपन्याना त्यांच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी आहे.

“आम्ही ‘बीअर बॉटल प्रोजेक्ट’ सुरू केला कारण आम्हाला समजले की बिअरच्या बाटल्या ही एक मोठी समस्या बनत चालली आहे कारण लोकांनी काचेचा वापर प्लास्टिकप्रमाणेच सुरू केला आहे. काचेला प्लॅस्टिकच्या तुलनेत नष्ट होण्यासाठी जास्त वेळ लागतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

“मोठमोठ्या कंपन्या अजूनही त्यांच्या बाटल्या परत घेतात, परंतु रिटेल आउटलेट अजूनही ते करण्यास उत्सुक नाहीत कारण त्यांच्याकडे रिकाम्या बाटल्या ठेवण्यासाठी जागा नाही. काचेची वाहतूक करणे महाग आहे, त्यामुळे बाटल्यांचीह वाहतूक करणे ही समस्या बनत आहे. जुन्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यापेक्षा नवीन बाटल्या तयार करणे स्वस्त आहे,” असेही डिसोझा म्हणाल्या.

नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात पर्यटकांच्या पसंतीच्या अल्कोहोलच्या यादीत बिअर अव्वल स्थानावर आहे. बिअरच्या बाटल्यांमुळे निर्माण होणार्‍या कचर्‍यावर उपाय योजण्यासाठी स्टेकहोल्डर्सना सहभागी करून घेणे हे ‘बीअर बॉटल प्रोजेक्ट’चे उद्दिष्ट आहे.

“आत्ता आम्हाला काही स्थानिक कंपन्यांशी संपर्क साधून या समस्येवर उपाय शोधायचे आहेत, जसे की आम्ही बाटल्या कोठे गोळा करू शकतो, कदाचित आम्ही एखाद्या विशिष्ट केंद्रावर बाटल्या धुवू शकतो. हे अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. आणि, आशा आहे की, आम्ही कधीतरी धोरणात्मक बदल घडवून आणू शकतो,” असे डिसोझा पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com