होंडा आयडीसी परिसर बनतोय कचरा डेपो, प्रशासनाचे दुर्लक्ष

दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता, कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी
Garbage Issue in Honda IDC
Garbage Issue in Honda IDCDainik Gomantak

वाळपई : होंडा पंचायत क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात खुलेआम कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असून अजूनही आयडीसी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. (Garbage Issue in Honda IDC Goa News Updates)

Garbage Issue in Honda IDC
क्रीडामंत्री अॅक्शन मोडमध्ये, भल्या पहाटे फातोर्डा स्टेडियमची पाहणी

होंडा औद्योगिक वसाहतीत सालेली बस स्थानकाच्या मागच्या भागात गेल्या कित्येक दिवसांपासून घरगुती तसेच व्यावसायिक कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या जागेला डम्पिंग ग्राऊंडचं रुप आलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा टाकला असल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. होंडा वाळपई दरम्यानच्या रस्त्याच्या अगदी जवळ कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधीचा त्रास वाहनचालक तसेच प्रवाशांना होत आहे.

Garbage Issue in Honda IDC
खुल्या बाजारातून वीज खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी

कचरा टाकला जात असलेली ही जागा औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात येत असूनही अजून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष कसे काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या कचऱ्यामुळे परिसरात प्रदूषण होत असून दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान होंडा पंचायतीच्या मालकीच्या जागेत लाखो रुपये खर्चून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारला असताना हा कचरा बाहेर का टाकला जातो याची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com