Rumdamol: सरपंच कक्षात टाकला कचरा! संकलनाचा प्रश्‍न न सुटल्याने कृती

Garbage Collection Issue At Rumdamol Panchayat: पंच सदस्‍य यांनी कचरा आणून सरपंच मुबिना यांच्‍या केबिनमध्‍ये टाकला; रुमडामळ पंचायतीकडून पोलिसांत तक्रार
Garbage Collection Issue At Rumdamol Panchayat: पंच सदस्‍य यांनी कचरा आणून सरपंच मुबिना यांच्‍या केबिनमध्‍ये टाकला; रुमडामळ पंचायतीकडून पोलिसांत तक्रार
Rumdamol Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रुमडामळ येथे पंचायतीतर्फे कचरा संकलन केले जाते ते व्‍यवस्‍थित होत नसल्‍याचा आरोप करत रुमडामळचे पंच सदस्‍य विनायक वळवईकर यांनी आज रस्‍त्‍यावरील कचरा आणून सरपंच मुबिना फणिबंद यांच्‍या केबिनमध्‍ये टाकला.

साचून राहिलेल्‍या कचऱ्याची घाण कशी येते याची कल्‍पना सरपंचांना यावी यासाठी आपण ही कृती केल्‍याचे वळवईकर यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पंचायतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Garbage Collection Issue At Rumdamol Panchayat: पंच सदस्‍य यांनी कचरा आणून सरपंच मुबिना यांच्‍या केबिनमध्‍ये टाकला; रुमडामळ पंचायतीकडून पोलिसांत तक्रार
Rumdamol : रुमडामळमध्ये पुन्हा तणाव! बंदोबस्तात वाढ

वळवईकर यांनी केलेल्‍या दाव्‍याप्रमाणे रुमडामळ येथील काही भागात मागचे चार-पाच दिवस कचऱ्याचे संकलन केलेले नाही. त्‍यामुळे कचरा साचून सगळीकडे दुर्गंधी पसरली हाेती. या समस्‍येकडे सरपंचांचे लक्ष वेधले. मात्र, त्‍यांनी त्‍याकडे काहीच लक्ष दिले नाही. यामुळेच आपल्‍याला ही कृती करावी लागली, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Harit Goa sapling Plantation
Goa political leaders clash over development projects
Nasnola panchayat garbage fine
Goa Panchayat Construction
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com