Garbage Collection In Madgaon: कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून सर्वजण ‘हे केले पाहिजे, ते केले पाहिजे’, अशा पोकळ घोषणा करताना दिसतात. मात्र, मडगावातील महिला मंडळाने कचरा व्यवस्थापनाचा अभिनव उपक्रम राबवून या क्षेत्रात आदर्श पायंडा घालून दिला आहे.
आतापर्यंत या मंडळाने कचऱ्याचे संकलन आणि वर्गीकरण करून तब्बल सहा हजार किलो कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावला आहे.
गेली साडेतीन वर्षे हे मंडळ कचऱ्याचे व्यवस्थापन करत असून आतापर्यंत कचरा संकलनाच्या 34 फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. 35 वी फेरी या महिन्याच्या अखेरीस सुरू केली जाणार आहे. या उपक्रमाला श्री दामोदर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी आणि आध्यापिका शर्मिला कुंदे यांचे सहकार्य लाभते.
त्यामुळे कचरा विल्हेवाटीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती होते. विद्यार्थ्यांचे पालकही मुलांना या कामी प्रोत्साहन देतात. मंडऴातर्फे कचरा संकलन, वर्गीकरण व पुनर्प्रक्रिया या विषयावर व्याख्याने आयोजित केली जातात. कचरा घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
आर्थिक उत्पन्नाचे साधन
कचरा संकलनाची पहिली फेरी 27 जुलै 2019 रोजी सुरू झाली. कचरा वाहून नेण्यास मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी वाहने उपलब्ध करून दिली आणि अजूनही देतात. मात्र, कोविड महामारीच्या काळात हा उपक्रम खंडित झाला. मात्र, ऑगस्ट 2021 पासून ही सेवा पूर्ववत सुरू झाली.
या मोहिमेद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया आणि पर्यावरणाचे रक्षणही होते. त्याशिवाय मंडळाला आर्थिक उत्पन्नही मिळते. आतापर्यंत या 6 हजार किलोहून अधिक कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठविल्याची माहिती कामत यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.