Goa Crime News: गाड्यांचे सुट्टे भाग करून विकणार होते... पण त्याआधीच सापडले पोलिसांच्या जाळ्यात

गॅरेजमधून वाहने चोरणाऱ्या टोळीला म्हापशात अटक; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: गॅरेजसमोर पार्क केलेली तीन दुचाकी चोरुन त्या वाहनांचे सुटे भाग करुन भंगार अड्ड्यात विकण्याच्या बेतात असलेल्या तीन चोरांच्या मुसक्या म्हापसा पोलिसांनी आवळल्या. पोलिसांनी या संशयितांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Goa Crime News
Goa Accident News: भरधाव दुचाकी गाईला धडकली; अपघातात युवक जागीच ठार

म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांच्या माहितीनुसार, चोरीची घटना ही 25 फेब्रुवारी रोजी घडली होती. तक्रारदार करीम मुल्ला (35, गंगानगर-खोर्ली) यांचे स्वतःचे घाटेश्वरनगर म्हापसा येथे करीम गॅरेज नामक दुकान आहे.

तिथे ही वाहने पार्क केली होती. या चोरांनी ही वाहने घटनास्थळावरुन चोरून नेली. वाहनांमध्ये पल्सर (जीए 03 क्यू 8135), टीव्हीएस व्हिक्टर मोटरसायकल (जीए 07 ए 1964) व पल्सर (जीए 03 डी 7224) यांचा समावेश होता.

तपासाअंती पोलिसांनी संशयित प्रज्योत च्यारी (34, डांगी कॉलनी, म्हापसा), शाहिद सिद्धीकी (29, करासवाडा-म्हापसा) व संदेश साळकर (27, रा. दत्तवाडी, मूळ खुटवळ-पेडणे) यांना अटक करीत चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

Goa Crime News
Nilesh Cabral: पाणी बिल थकबाकी भरण्यासाठी OTS योजनेला अखेरची मुदतवाढ; आता 'या' तारखेपर्यंत भरता येईल बिल

तिघाही संशयितांनी चोरीच्या दुचाकींचे भाग सुटे करुन या मालवाहू गाडीतून (जीए 03 एन 3547) ते भंगारअड्ड्यात विकण्याचा त्यांचा बेत होता. म्हापसा पोलिसांनी संशयितांना या मालवाहू वाहनसह मोठ्या शिताफीने पकडले. या संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाकडून मिळाली आहे.

पोलीस अधीक्षक जिवबा दळवी व पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, आनंद राठोड, अक्षय पाटील यांनी चोरांना पकडण्यात कामगिरी बजावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com