Calangute: कळंगुटमध्ये कर्नाटकातील पाच चोरांच्या टोळीला अटक; 10 मोबाईलसह सोन्याची चेन जप्त

पोलिसांनी टोळीकडून हस्तगत केला 5 लाखांचा मुद्देमाल
Calangute | Goa Crime
Calangute | Goa CrimeDainik Gomantak

Calangute: सध्या नुतन वर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवर मोठी गर्दीही होत आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पर्यटकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे प्रकार घडत आहे. शुक्रवारी कळंगुट पोलिसांनी पाच चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 मोबाईल फोनसह सोन्याच्या साखळीचे तुकडेही जप्त केले आहेत.

Calangute | Goa Crime
Mahadayi Water Disputes: कर्नाटक विरोधातील 'म्हादई'चे युद्ध आम्हीच जिंकू; जलस्त्रोत मंत्री शिरोडकर यांचा विश्वास

राम भौमिक, अनिल रामु राठोड, संजीव सिंग, सनी साहो आणि योगेश देवानिया अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. हे सर्व मुळचे कर्नाटकचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Calangute | Goa Crime
Mahadayi Water Disputes: 'म्हादई'साठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी बोलावली मंत्रीमंडळाची विशेष बैठक

दरम्यान, कळंगुट पोलिसांनी महाराष्ट्राच्या दोन टोळ्यांतील 12 जणांनाही गजाआड केले होते. त्यांच्याकडून अनेक आयफोनसह 41 मोबाईल जप्त केले आहेत. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले की, सनबर्न ईडीएमला ड्रग्ज तसेच मोबाईल चोऱ्यांचे प्रकार होत असल्याने दहा वेगवेगळी साध्या वेशातील पोलिस पथके किनारपट्टी भागात तैनात केले आहेत. महाराष्ट्रातील हे चोरटे बागा येथील एका हॉटेलात राहत होते. ते एका इनोव्हा गाडीने गोव्यात आले होते ती गाडीही जप्त केली आहे. या टोळीत सुमारे 25 जण असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे, असे वाल्सन यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com