Mahadayi Water Disputes: 'म्हादई'साठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी बोलावली मंत्रीमंडळाची विशेष बैठक

बैठकीचा एकच अजेंडा, दुसऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा नाही
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Disputes: म्हादई बाबत केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या बाजूने दिलेल्या निर्णयानंतर आता गोवा सरकारने वेगाने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी 2 जानेवारी रोजी मंत्रीमंडळाची विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीचा एकच अजेंडा असणार आहे तो म्हणजे 'म्हादई.'

CM Pramod Sawant
Mahadayi Water Dispute : म्हादईसाठी भांडणारे खंवटे गप्प का? अमरनाथ पणजीकरांनी शेअर केला जुना व्हिडीओ

दरम्यान, या बैठकीत म्हादई व्यतिरीक्त इतर कोणत्याही विषयावर चर्चा होणार नसल्याचे समजते. म्हादईबाबतच्या निर्णयाने गोवा सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यभरातून याबाबत तीव्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या. विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरण्यास सुरवात केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या मुद्यावरून सर्व आमदारांनी राजीनामा देण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन केले. तर आमदार विजय सरदेसाई यांनी पंतप्रधानांनी कर्नाटकचा अहवाल न फेटाळल्यास मुख्यमंत्री राजीनामा देतील काय, असा सवाल केला होता. त्यामुळे या मुद्याबाबत राज्य सरकारचे पुढील धोरण ठरविण्याबाबत या नियोजित बैठकीत चर्चा होऊ शकते.

CM Pramod Sawant
Nilesh Cabral: लाँचनंतर काही तासातच PWD Goa अ‍ॅपवर नागरीकांकडून खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस

याआधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 2 जानेवारी रोजी राज्यातील विविध खाते प्रमुखांची बैठक बोलावल्याची माहिती होती. गोव्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून ते मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रश्नांवर सुद्धा बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात होते. 2 जानेवारीला दिवसभर बैठका होणार आहेत. सकाळी 10.30 वाजता सचिवांसोबत बैठक, 11.30 ला सर्व खात्यांच्या प्रमुखांसोबत बैठक तर सायंकाळी 4 वाजता उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com