Mapusa Theft: 6 दिवस उलटले, मुख्य दरोडेखोर मोकाटच; म्हापसा चोरीप्रकरणी पोलिस पथके दक्षिणेकडे रवाना

Ganeshpuri Mapusa Theft: पोलिसांची विविध पथके आता आंध्र प्रदेश, हैदराबाद, कर्नाटक (बंगळुरू) या प्रदेशांमध्ये तळ ठोकून आहेत. तर कर्नाटकात गेलेली पथके गोव्यात माघारी परतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Police
PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गणेशपुरी-म्हापसा येथे डॉ. घाणेकरांच्या बंगल्यावरील सशस्त्र दरोड्याच्या घटनेला रविवारी (ता. १२) सहा दिवस पूर्ण झाले असले तरी, गोवा पोलिसांच्या हाती मुख्य दरोडेखोरांबाबत ठोस काहीच लागलेले नाही.

सध्या गोवा पोलिसांनी आपल्या तपासाचे लक्ष्य दक्षिणेकडील राज्यांवर केंद्रित केल्याचे पोलिस पथकांच्या हालचालीवरून दिसते. पोलिसांची विविध पथके आता आंध्र प्रदेश, हैदराबाद, कर्नाटक (बंगळुरू) या प्रदेशांमध्ये तळ ठोकून आहेत. तर कर्नाटकात गेलेली पथके गोव्यात माघारी परतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या दरोड्याप्रकरणी गोवा पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले असले तरी हे संशयित मुख्य गुन्हेगार नाहीत. मात्र, मुख्य टोळीला ‘लॉजिस्टिक सपोर्ट’ (रसद) पुरवणारे साथीदार म्हणून त्यांची भूमिका निश्चित झाली आहे.

Police
Mapusa Theft: कार, मोबाईल दिले फेकून! गोव्‍याची सीमा ओलांडण्‍यात दरोडेखोरांना यश; म्हापसा चोरीसाठी केला होता फुलप्रूफ प्लॅन

पकडलेले सर्वजण पश्चिम बंगालचे आहेत. ७ ऑक्टोबर रोजी सहा ते सात जणांच्या टोळीने डॉ. घाणेकरांच्या बंगल्यात पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान घुसून या कुटुंबाला ओलीस ठेवले होते. यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, डॉ. घाणेकर दाम्पत्य आणि ८० वर्षीय वृद्धेचा समावेश होता. टोळीने या घरातून रोख व मौल्यवान वस्तू मिळून ३५ लाखांचा ऐवज पळविला होता.

Police
Mapusa Theft: म्हापसा दरोडाप्रकरणी 5 जण जेरबंद! मुख्य संशयित अजून मोकाट; पोलीस अधिकाऱ्यांचे मौन

पोलिसांकडून गोपनीयता; गूढ वाढले

गोवा पोलिसांनी संशयितांना पकडण्यासाठी बंगळुरू, हैदराबाद आणि मुंबईच्या दिशेने आधी मोर्चा वळविला होता. कालांतराने पोलिस पथके आंध्र प्रदेशमध्ये पोहचली. असे असले तरी, गोवा पोलिस किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी माध्यमांना कोणतीच औपचारिक माहिती पुरविली जात नाही. पोलिसांनी या तपासाविषयी कमालीची गोपनीयता बाळगली असल्याने प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com