Ganeshotsav 2024: गणपती मिरवणुकीत रात्री १० नंतर DJ चा दणदणाट नकोच; उपजिल्हाधिकाऱ्यांची मंडळांना तंबी

Bardez Deputy Collector: गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, पूर्वतयारी बैठक आज बार्देश उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील प्रशासकीय इमारतीत पार पडली
Bardez Deputy Collector: गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, पूर्वतयारी बैठक आज बार्देश उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील प्रशासकीय इमारतीत पार पडली
Bardez Deputy CollectorDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ganpati Festival 2024

म्हापसा : गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, पूर्वतयारी बैठक शुक्रवारी बार्देश उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील प्रशासकीय इमारतीत पार पडली. याला तालुक्यातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलिस, अग्निशमन दल व प्रमुख प्रशासकीय अधिकारी हजर होते. गणेशोत्सव शांततेत तसेच कायदा व सुव्यस्थतेचा भंग न होता, आदर्शरितीने साजरा व्हावा या पार्श्वभूमीवर ही बैठक होती.

उपजिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या सूचना करीत मंडळांना मंडपस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यापासून इतर खबरादारीबाबत सूचना केल्या. तसेच रात्री दहा वाजल्यानंतर ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होणार नाही याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंद होतील, असा इशारा दिला.

म्हापसा अग्निशमन दलाचे प्रभारी गणेश गोवेकर म्हणाले, की मार्केट परिसर तसेच इतरत्र लोंबकळणाऱ्या तारा हटविण्याची सूचना वीज विभागास करावी अशी मागणी त्यांनी केली. उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांनी सर्व सार्वजनिक मंडपस्थळी अग्निशमन यंत्र बसविण्याची मागणी केली. यावर बोलताना गोवेकरांनी सुचविले की, मंडळांनी आपल्या कार्यकर्त्यांची नावे द्यावी, जेणेकरून अग्निशमन यंत्रणा आपत्कालीनवेळी कशाप्रकारे हाताळायची याची प्रात्यक्षिके देता येतील.

उपजिल्हाधिकारी शिरगावकर म्हणाले की, विसर्जनस्थळी आवश्यक रोषणाई तसेच सुरक्षारक्षक नेमावेत. तसेच बाजारपेठेत पीओपीच्या गणेशमूर्तींवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांसह पालिका व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. कारण पीओपी मूर्तींमुळे पर्यावरणाला हानी पोहचते.

गणेश विसर्जनापूर्वी तार नदीमधील गाळउपसा करावा अशी मागणी मंडळांनी केली. कारण यास्थळी मोठ्या प्रमाणात श्रींचे विसर्जन होते. पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ नदीपात्रात साचल्याचे संबंधितांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. पोलिसांनी सांगितले की, मंडपस्थळी मंडळांनी आपले कार्यकर्ते ठेवावेत. पोलिस सुरक्षा असणारच परंतु कार्यकर्ते असल्यास मदत होते. तसेच म्हापसा मार्केट परिसरात रात्रीच्यावेळी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली. तसेच मार्केटमधील वॉटर हायड्रंटचे दाब तपासण्याची सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांनी करीत, संबंधितांना संयुक्त पाहणीचे निर्देश दिले.

माटोळी बाजार स्थलांतराचा प्रस्ताव पडला मागे...

म्हापसा वाहतूक पोलिस निरीक्षकांनी म्हापसा मार्केटमधील माटोळी बाजार बोडगेश्वर मंदिराकडे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मांडला. जेणेकरून मार्केट परिसरातील वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास मदत होईल, परंतु म्हापसा व्यापारी समितीने याला आक्षेप घेत म्हटले की, बाजारात माटोळी बाजार व्यवस्थितपणे चालतो. पालिकेकडून आवश्यक खबरदारी घेतल्या जातात. त्यामुळे बाजार इतरत्र हलविण्याची गरज नाही. तसेच माटोळीचा बाजार दुसरीकडे हलविण्यास मार्केटच्या उलाढालीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला. या प्रस्तावाला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, सचिव सिद्धेश राऊत यांनी कडाडून विरोध केला.

Bardez Deputy Collector: गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, पूर्वतयारी बैठक आज बार्देश उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील प्रशासकीय इमारतीत पार पडली
Bardez: अतिवृष्टीमुळे बार्देशात भातशेतीचे ६९ लाखांचे नुकसान; ९५० भरपाई अर्ज

स्पीकरचा आवाज नको

गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्याची काळजी घ्यावी. तसेच रात्री १० नंतर मोठ्या आवाजात डिजे किंवा लाऊड स्पीकरचा वापर केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होणार नाही याचे मंडळांनी पालन करावे. अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल होतील. त्यामुळे साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवण्याचे आवाहन मंडळांना करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com