Ganesh Festival: गणेशोत्सव सुटी ख्रिस्तींना लाभदायी, गोमंतकीय भाविकांचे वालंकणी सायबिणीच्या फेस्तासाठी प्रस्थान

Ganesh Festival Goa: गोव्यात गणेशोत्सवानिमित्त शाळांना देण्यात आलेली आठवडाभराची सुट्टी यंदा ख्रिस्ती समुदायाच्याही पथ्यावर पडली आहे.
Ganesh Festival
Ganesh FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात गणेशोत्सवानिमित्त शाळांना देण्यात आलेली आठवडाभराची सुट्टी यंदा ख्रिस्ती समुदायाच्याही पथ्यावर पडली आहे. नेमकी हीच सुट्टी साधून शेकडो गोमंतकीय भाविकांनी तामिळनाडूतील प्रसिद्ध वालंकणी सायबिणीच्या फेस्तासाठी प्रस्थान केले आहे. धार्मिक सलोख्याचे एक वेगळे उदाहरण यातून समोर आले आहे.

दरवर्षीप्रमाणे ‘माडी’, नोव्हेना आणि वालंकणी फेस्त यांत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. गोव्यातून वालंकणीला अनेकजण रस्ता मार्गेही रवाना झाले आहेत.

त्यापैकी काहींनी सांगितले की, ते २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘माडी’मध्ये सहभागी होण्यासाठी लवकर रवाना झाले आहेत. त्यानंतर सलग नोव्हेना प्रार्थना आणि ८ सप्टेंबर रोजी होणारे वालंकणी सायबिणीचे फेस्त यांसाठी अनेक भाविक तिथे मुक्काम करणार आहेत.

Ganesh Festival
Chess World Cup Goa: दिल्ली नाही 'गोवा'! FIDE चेस विश्वचषक 2025 ची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

दरवर्षीच्या तुलनेत यंदा यात्रेकरूंची संख्याही लक्षणीयरीत्या जास्त असण्याची शक्यता आहे. कारण गणेशोत्सव सुट्टीमुळे विद्यार्थ्यांपासून ते कुटुंबीयांपर्यंत सर्वांसाठी या धार्मिक प्रवासाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा यात्रेकरूंच्या संख्येत वाढ

वास्कोहून सोमवारी सकाळी वास्को-वालंकणी थेट रेल्वेगाडी शेकडो यात्रेकरूंना घेऊन निघाली. शिवाय अनेकांनी केरळमार्गे जाणाऱ्या दूर अंतराच्या गाड्यांचा पर्याय निवडला. विशेष म्हणजे, यंदा शाळकरी मुलांनाही गणेशोत्सवाच्या सुट्टीचा लाभ घेऊन कुटुंबासह वालंकणीला जाण्याची संधी मिळाल्याने यात्रेकरूंची संख्या नेहमीपेक्षा जास्त असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Ganesh Festival
Water Metro Goa: वॉटर मेट्रोमुळे 'पर्यटनाला' मिळणार चालना! मंत्री फळदेसाईंनी व्यक्त केली आशा; कोचीत जलमार्गावर केला प्रवास

गोमंतकीय ‘तियात्र’चे खास आकर्षण : या यात्रेतील एक वेगळे आकर्षण म्हणजे गोव्याचे ख्यातनाम कोकणी तियात्र कलाकार. दरवर्षीप्रमाणे यंदाही कलाकारांची एक फळी वालंकणी चर्चच्या मुख्य रंगमंचावर गोव्यातील संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे. दिग्दर्शक इनासियो डायस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने येथे तियात्र सादर केले आहे. यंदा २८ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० वाजता विनामूल्य तियात्र सादर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com