Ganesh Festival 2025: परंपरा, कला आणि पर्यावरणाचा संगम... सुबक गणेशमूर्ती साकारणारे 'च्यारी घराणे'; दक्षिण गोव्यात प्रसिद्ध

Goa Ganesh Festival: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. पण या उत्सवाची खरी ओळख घडवतात त्या म्हणजे हाताने साकारलेल्या सुबक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती.
Goa Ganesh Festival
Goa Ganesh FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

The Ganesh Festival 2025: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. पण या उत्सवाची खरी ओळख घडवतात त्या म्हणजे हाताने साकारलेल्या सुबक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती. अशा मूर्तीकलेचा वारसा जपणारे आहेत काणकोणचे च्यारी घराणे.

चार रस्ता-नगर्से-काणकोण येथे च्यारी घराणे पिढ्यान्‌पिढ्या चिकण मातीच्या गणेशमूर्ती घडवत आले आहे. सध्याचे युवा मूर्तिकार मनोज रमेश च्यारी आणि त्यांचे भाऊ रूपेश, गौरांग, युनिक, समर्थ, वेदांत, पार्थ तसेच बहिणी बबिता आणि सुषमा हे सर्वजण मिळून हा वारसा पुढे नेत आहेत.

कुठल्याही मोठ्या पाठबळाशिवाय, फक्त कलेवरील निष्ठा आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी दक्षिण गोव्याच्या असंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

च्यारी बंधूंचे वडील, कै. रमेश राया च्यारी हे १९७० च्या दशकातील नामांकित मूर्तिकार आणि चित्रकार होते. त्यांच्या प्रेरणेनेच पुढची पिढी मूर्तीकलेशी जोडली गेली. शाळकरी वयातच मनोज आणि रूपेश यांनी चित्रकलेपासून सुरुवात केली आणि पुढे मूर्ती घडवणे, सजावट आणि रंगकामात हातखंडा मिळवला. ‘युनिक च्यारी बंधू गणपती चित्रशाळा’ ही आज त्यांच्या कार्याचा गाभा बनली आहे.

सौंदर्य टिकवण्यावर भर

आज मात्र परिस्थिती बदलली आहे. पूर्वी सहज मिळणारी चिकण माती आता दुर्मिळ झाली आहे. तरीही या मातीच्या अद्वितीय पोतातच मूर्ती साकारण्याचा प्रयत्न ते करत आहेत. नैसर्गिक रंगांच्या जागी वॉटर कलर आले असले, तरी सौंदर्य टिकवण्यावर त्यांचा भर असतो.

मनोज च्यारी सांगतात, गणेश मूर्तिकला ही शिल्पकलेचाच भाग आहे. माध्यम काहीही असो, लाकूड, फायबर वा माती प्रत्येक मूर्तीचा आरंभ मातीपासूनच होतो. मोठ्या मूर्तींसाठी आर्किटेक्चर व इंजिनिअरिंगचे ज्ञान लागते आणि ते कसोशीने साध्य करावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com