कोरोना महामारीच्या (COVID- pandemic) काळाने अनेकांचे पाय जमनीवर आले आहेत . कोणतेही काम करण्याची तयारी असेल तर कितीही संकटे आली तर ती आपण सहज परतून लावू शकतो. कोरोना महामारीमुळे (COVID-19 pandemic) स्थानिक गणपती मुर्तीकाराना (Ganesh idol making artists) मागच्या दोन वर्षापासून खूप फायदा झाला आहे. (Ganesh Festival 2021: Business of Lord Ganesha idol-making boom in Goa)
हेरवी उठसुठ गोवेकर महाराष्ट्र राज्यातून घरगुती गणपतीच्या मुर्त्या पूजनासाठी आणत असत ते आता स्थानिक मूर्तिकारांकडून मुर्त्या विकत घेतल्या जातात त्यामुळे स्थानिकाना त्याचा खूप लाभ होतो, असे मत पोकेवाडा मोरजी येथील बाबा पोके यांच्या १०० वर्षाची गणेशमूर्ती परंपरा जपणारे त्यांचे नातू उमाकांत पोके यांनी गणेशमूर्ती विषयी माहिती देताना सांगितले.
पोकेवाडा मोरजी येथील बाबा पोके यांची मागच्या १०० वर्षाची गणेशमूर्ती चित्रशाळा आहे , आणि ती चित्रशाळा आज तिसरी पिढी चालवत आहे .मातीला आकार देण्याचेच काम नव्हे तर नवोदित कलाकारांना घडवण्याचे कार्यही अविरत या ठिकाणी चालू आहे.
बाबा पोके ,अनंत पोके यांनी अनेक कलाकाराना घडवले ,अनंत पोके यांनी तर अनेक स्थानिक आणि राज्यातील कलाकाराना व्यासपीठ मिळवून दिले आहे तोच वारसा आजही पोके कुटुंबातील प्रत्येक सदस्य चालवत आहे . बाबा पोके यांची तिसरी पिढीही आताहीउमाकांत पोके यांच्या रूपाने नवीन कलाकार घडवण्याचे काम करत आहेत.
बाबा पोके यांची १०० वर्षाची चित्रशाळा तिसरी पिढी उमाकांत पोके चालवत आहे , त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेतले . असता त्यांनी बोलताना कोरोना काळात स्थानिक मुर्तीकाराना कश्या पद्धतीचा लाभ झाला त्याविषई सविस्तर माहिती देताना कोरोना पूर्वी अनेक गणेश भक्त महाराष्ट्र येथे जावून घरगुती मुर्त्या आणायच्या पण लॉक डाऊन मुळे बंधने आल्याने स्थानिक कलाकारांकडून मुर्त्या करायला देत आहेत त्यामुळे स्थानिकांच्या चित्रशाळेत मुर्त्या वाढत आहे .
उमाकांत पोके हे मागच्या २६ वर्षापासून दरवर्षी किमान १५० मुर्त्या त्यात करत आहे .आता पर्यंत ३९०० मुर्त्या त्यांनी तयार केलेल्या आहेत .
कोरोना काळात स्कूल बंद असल्याने काही विधार्थी आमच्या चित्रशाळेत गणेशमुर्त्या कश्या तयार कराव्यात यांची प्रशिक्षण विनामुल्य घेत आहे त्यात आशिष वेंगुर्लेकर [ वरचा वाडा ], युवराज पोके , अभिनव पवार (मधला वाडा), पराग खाद्जी ,सिद्धांत पोके हे बालकलाकार धडे घेतात शिवाय संजय वाडजी हेही मूर्ती करण्यास मदत करतात .
या चित्रशालेळा गावा बाहेर व पेडणे बाहेर सार्वजनिक मूर्ती करण्याचा मान मिळाला आहे , कासार्वारणे सार्वजनिक , पेडणे पोलीस स्टेशन सार्वजनिक आणि वास्को पोलीस स्टेशन सार्वजनिक मुर्त्या तयार करण्याचा मान या शाळेला मिळाल्याने समाधान वाटते असे त्यांनी सांगितले . कुठलीही कला आत्मसात करण्यासाठी अगोदर मन स्थिर ठेवावे लागेल , मातीत हात घालून मातीला सुंदर आकार देण्यासाठी युवापिढीने या क्षेत्रात यायला हवे असे आवाहन उमाकांत पोके यांनी करून कुणाला मार्गदर्शन हवे असेल तर आपण मोफत देण्याची तयारी ठेवतो असे सांगितले .
ज्याना मुर्त्या बनवता येत नाही त्याच्याकडे शेकडो मुर्त्या ?
उमाकांत पोके यांनी खंत व्यक्त करताना काहीजण मातीत हात न घालता त्यांच्याकडे शेकडो मुर्त्या उपलब्ध आहेत. त्यांनी कधी मुर्त्या केल्या नाही, आज काल अनेक बाजारात मुर्त्या उपलब्ध आहेत ते केवळ धंदा म्हणून करतात त्यांनी कधी मुर्त्या बनवल्या असतील तर त्यांबी स्वताला प्रश्न विचारावा असे पोके यांनी सांगितले. बाजारू स्वरूपामुळे खऱ्या मुर्तीकारावर अन्याय होतो असे पोके सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.