Goa Ganesh Chaturthi|राजकीय मंडळींचे गणेश दर्शन

गणेश दर्शनाची छायाचित्रे मल्टिमीडियावर दाखल
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सध्या गणेशोत्सवामुळे राज्यातील राजकीय नेते कार्यकर्ते आणि इतर नेत्यांच्या घरोघरी गणरायाच्या दर्शनाला जात आहेत. ज्यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती होता, त्यांचे विसर्जन झाल्याने हे नेते मंडळी आता कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन दर्शन तर घेतातच शिवाय तेथील विविध पदार्थांचाही आश्‍वाद घेत आहेत. विशेष करून समाजमाध्यमांत सक्रिय असणारी ही मंडळी आपल्या भेटीची छायाचित्रे अपलोड करण्यात मागे नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

(Ganesh darshan was taken by political groups in Goa)

Goa Politics
Goa Sports News| गोव्यातील फुटबॉलमध्ये ‘फॅमिली राज'

चतुर्थीला मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलेले विरोधी काँग्रेस पक्षाचे आमदार पाहता तो विषय चर्चेचा ठरला आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे या जोडगोळीने शनिवारी अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या घरी गणेश दर्शन घेतले. त्याशिवाय अनेक आमदारांनी आपापल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेण्यावर भर दिला.

पणजीत आमदार बाबूश मोन्सेरात व नगरसेवकांचे आपापल्या प्रभागात नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे फलक लावलेले निदर्शनास पडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला उत्पल पर्रीकर हे आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी गणेश दर्शन घेत आहेत. विशेष म्हणजे या घरोघरी भेटीची छायाचित्रे समाजमाध्यमांत सामायिक केली गेली आहेत. त्यामुळे मूळ भाजपचे व पक्षनिष्ठा म्हणून आमदारांबरोबर असणारे कार्यकर्ते आपल्या गणेश दर्शनाला बाबूश येतील अशी आशा बाळगून आहेत.

राजकीय पेरणीची शक्यता

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक राजकीय नेते प्रमुख कार्यकर्ते किंवा पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या घरी जाणे पसंत करीत आहेत. त्यामागे एक स्नेह असलातरी भविष्यातील राजकीय खेळीची पेरणी असते, हे राजकारण्यांना माहीत असते. त्यासाठीच निमित्त अशा उत्सवाचेही असतेच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com