Ganesh Chaturthi 2023: चतुर्थीचे उत्सवपर्व सुरू; नोकरदार गावाकडे रवाना

गोव्याच्या राज्यपालांच्या शुभेच्छा
Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chaturthi 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi 2023: राज्यभरात घरोघरी चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच लाडक्या गणरायाचे अमाप उत्साहात स्वागत करण्यात आले. मंगळवारी सकाळी शुभ मुहुर्तावर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

महागाई आणि पावसाचे सावट झुगारून देत गोमंतकीयांनी चवथ साजरी करण्याचे ठरवल्याचे गेल्या चार-पाच दिवसांतील बाजारातील उलाढाल आणि घरोघरी सुरू असलेल्या तयारीवरून दिसून येत होते.

सोमवारी दिवसभर गणेशमूर्ती घरी नेण्यात आणि तयारीवर शेवटचा हात फिरवण्यात आबालवृद्ध मग्न होते. मंगळवारी चतुर्थी असल्याने शुक्रवारी रात्रीच अनेक नोकरदार-व्यावसायिकांनी आपले मूळ गाव गाठले होते.

सरकारी कार्यालयांत सोमवारी कर्मचाऱ्यांची केवळ नावालाच उपस्थिती होती. नव्वद टक्के कर्मचारी रजेवर होते. शाळा, महाविद्यालयांना आठवडाभराची सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांनाही आपल्या पालकांसोबत गावी जाणे शक्य झाले.

Goa Ganesh Chaturthi 2023
Positive News: बधाई हो लडकी हुई! मोले येथे इमर्जन्सी प्रेग्नेंसी केसला आरोग्य खात्याचा जलद प्रतिसाद; आई बाळ सुरक्षित

राज्यपालांच्या शुभेच्छा

चतुर्थीनिमित्त राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आर्च बिशप फिलीप नेरी कार्डिनल फेर्रांव यांच्यासह मंत्री, आमदार, राजकीय नेत्यांनी गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या.

महिलांचे सुवर्णगौरी व्रत

प्रत्येक घरात, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या उत्साहाने मंगळवारी श्री गणरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. सोमवारी घरोघरी महिलांनी हरितालिकेची पूजा करत सुवर्णगौरी व्रत केले. त्यामुळे गणेशाच्या मखरात आज गौरी पूजन झाले.

चाकरमान्यांचे हाल

पुणे, मुंबई, बेळगाव, कोल्‍हापूरहून गोव्यात येणाऱ्या रस्त्यांवर सोमवारी मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अनेक गोमंतकीय अडकून पडले होते.

रेल्वे मार्गे येणाऱ्यांनाही बराच त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सायंकाळी घरी पोचू, अशा बेताने निघालेल्यांना घरी पोचेपर्यंत रात्र झाली होती.

सुरक्षेसाठी तीन हजार पोलिस तैनात

चतुर्थीनिमित्त राज्य पोलिस दल सक्रिय झाले असून उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यांत राखीव दलाच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळे आणि चतुर्थीनिमित्त गावी जाणाऱ्या भक्तांसाठी पोलिसांनी काही सूचना केल्या आहेत.

यामध्ये सीसीटीव्ही बसविणे, मौल्यवान साहित्य बँकांमधील लॉकरमध्ये ठेवावे. शेजाऱ्यांना मोबाईल नंबर देऊन संपर्कात राहण्यात सांगावे, असे निर्देश दिले आहेत.

सार्वजनिक मंडळांना सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा आणि पार्किंगची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

Goa Ganesh Chaturthi 2023
Vijai Sardesai: विजय सरदेसाईंच्या नावाने फेसबूकवर फेक अकाऊंट; सायबर पोलिसांत तक्रार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com