Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Dainik Gomantak

Ganesh Chaturthi 2023: रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर; गणेशभक्तांमध्‍ये उत्‍साह

वास्कोत सजावटीच्या साहित्यांनी फुलला बाजार
Published on

Vasco News: वास्‍को शहरातही ‘बाप्‍पा’च्‍या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. बाजारात खरेदीसाठी हळूहळू गर्दी वाढत आहे. सजावटीचे, रंगरंगोटीचे साहित्य उपलब्ध झालेले आहे. प्रत्येकाच्या घरात सजावटीचे काम सुरू झाले असून भक्तगण आतापासूनच गणरायाच्या आगमनासाठी आतुरलेले आहेत.

चतुर्थीच्‍या काळात नवीन विवाहितांसाठी ओझे देण्याची पद्धत आहे. त्यासाठी माटोळी, लाकडी सामान व इतर वस्तूंच्‍या खरेदीला वेग आला आहे. करंज्या करण्याच्या तयारीलाही वेग धरला आहे.

गोवा बागायतदार, गोवा सहकार भांडार तसेच तालुक्यातील किराणा, भुसारी दुकानांमध्‍ये खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. रविवारीसुद्धा ही दुकाने उघडी ठेवण्‍यात येत आहेत. त्‍यामुळे किराणा साहित्‍य खरेदीसाठी गर्दी होत आहे. काही ठिकाणी तर ‘ऑफर’ ठेवण्‍यात आल्‍या आहेत.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023: मोत्याच्या अलंकारांचे आकर्षण; डिचोलीत लगबग

खाद्यपदार्थांची घरोघरी रेलचेल

मखर सजावट, कमानी उभारणे, घराची साफसफाई आदी कामांना वेग आलाय. आता लवकरच मोदक, करंज्या, अन्‍य फराळ तसेच घरोघरी स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असेल.

अनेक सामाजिक संस्था, महिला स्‍वयंसाहाय्‍य गट विविध खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. कडधान्यांच्‍या किमतीत किंचित वाढ झाल्‍याचे सांगण्‍यात आले.

वास्को बाजारपेठेत भव्य स्टॉल्स उभारून त्या ठिकाणी खास चतुर्थीचे साहित्‍य उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचीही तयारी महिला गटांनी सुरू केली आहे.

विविध आकार, स्‍वरूपातील गणेशमूर्ती

मुरगाव तालुक्यातील गणेश चित्रशाळांमध्ये विविध स्वरूपातील, आकारातील गणेशमूर्ती बनविण्‍यात येत आहेत. अनेक ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

लोकांनी आपल्याला हव्या असलेल्या गणेशमूर्ती आगाऊ नावनोंदणीने आरक्षित करून ठेवल्‍या आहेत. मुरगाव, वास्को, बायणा, नवेवाडे, दाबोळी व परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक दररोज गणेशमूर्तीची नोंदणी करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com