G20 Summit Goa 2023 : भारतात अव्वल पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता

जी. किशन रेड्डी : बैठकीत युवा पर्यटन क्लबच्या सदस्यांशी साधला संवाद
G20 Summit Goa
G20 Summit GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji : भारतामध्ये जगातील अव्वल स्थानाचे पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता आहे. त्यासाठी पर्यटन स्थळांचा योग्य विकास झाला पाहिजे, असे मत केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी व्यक्त केले. गोव्यात सुरू असलेल्या  जी-२०  पर्यटन कार्यगटाच्या चौथ्या  बैठकीनिमित्त धेंपे एक्सप्लोरर्स युवा पर्यटन क्लबच्या सदस्यांशी रेड्डी यांनी आज संवाद साधला.

या सत्रामध्ये  युवा टुरिझम क्लबच्या उद्दिष्टांवर भर देण्यात आला. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक,  केंद्रीय पर्यटन आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट,  गोव्याचे पर्यटनमंत्री  रोहन खंवटे आणि भारत सरकारच्या पर्यटन महासंचालक मनीषा सक्सेना हे मान्यवर देखील उपस्थित होते. 

G20 Summit Goa
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दर सलग तिसऱ्या दिवशी जैसे थे; वाचा आजच्या किंमती

पर्यटनदूत बनण्याची संधी

रेड्डी म्हणाले, जम्मू-काश्मीर,  हरिद्वार,  काशी आणि केदारनाथ या पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत भर पडली आहे. गोवा सरकारचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केंद्रीय मंत्री रेड्डी यांचे आभार मानले.

तरुणांना पर्यटनदूत बनवण्याची आणि त्यांना पर्यटन क्षेत्रात सरकारसोबत भागीदार बनवण्याची सरकारची भूमिका त्यांनी विशद केली. विद्यार्थी आणि क्लबच्या सदस्यांनी पर्यटन उद्योगाच्या समस्या सोडवणारे आणि नवोन्मेषक बनावे, या गरजेवर खंवटे यांनी भर दिला.

G20 Summit Goa
Goa Narcotic Raid: सांगोल्डा येथे पोलिसांच्या छाप्यात 2.80 लाखांचे अमली पदार्थ जप्त

तरुणांचा सहभाग

केंद्रीय मंत्री रेड्डी म्हणाले, भविष्यातील पर्यटन क्षेत्राला आकार देण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ‘देखो अपना देश’ बाबत ते म्हणाले, अनेक जणांचा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांना भेट देण्याकडे कल असतो,  पण आपल्या मातृभूमीचे सौंदर्य आणि वारसा जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

युवा क्लबच्या सदस्यांनी जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रत्येक टप्प्यावर आपल्या देशाचा अनोखा वारसा अधोरेखित करण्यासाठी परिश्रम घ्यावेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com