Goa Sport News: राज्य सरकारचे सेलर्सना पूर्ण सहकार्य- क्रीडामंत्र्यांची ग्वाही

सेलर्सची कामगिरी राज्यासाठी अभिमानास्पद - गोविंद गावडे
Goa Sport News
Goa Sport NewsDainik Gomantak
Published on
Updated on

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ निवड चाचणीत पदके जिंकलेल्या गोव्यातील सेलर्सचे खास कौतुक करताना क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी खेळाडूंना राज्य सरकारच्या क्रीडा व युवा व्यवहार खाते, तसेच गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही शनिवारी दिली.

मुंबईत झालेल्या स्पर्धेत गोव्याची आंतरराष्ट्रीय सेलर कात्या कुएल्हो हिने महिलांच्या आयक्यू फॉईल प्रकारातील तिन्ही टप्प्पात अव्वल कामगिरी नोंदवत सुवर्णपदके जिंकली. तिने चीनमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.

सलग दुसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कात्या भारताचे प्रतिनिधित्व करेल. गोवास्थित आणखी एक सेलर अद्वैत मेनन याने युवा पुरुष गटातील आयएलसीए 4 प्रकारात दोन सुवर्णपदके जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात जागा मिळविली.

Goa Sport News
Baba Ramdev in Goa: गोवा हे योगसाधनेसाठी अत्यंत योग्य ठिकाण!

महिलांच्या आयएलसीए 4 प्रकारात गोव्याची युवा सेलर पर्ल कोलवाळकर हिने दोन रौप्य व एक ब्राँझपदक जिंकले. पर्ल आशियाई स्पर्धेसाठी राखीव खेळाडूंत आहे.

क्रीडामंत्री गावडे पदक विजेत्या सेलर्सची कामगिरी जाणून घेतली, तसेच आशियाई स्पर्धेसाठी त्यांच्या तयारीची माहिती घेतली. सेलर्सची स्पर्धेसाठी तयारी चांगली व्हावी या उद्देशाने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सेलर्सची कामगिरी राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे क्रीडामंंत्र्यांनी नमूद केले.

Goa Sport News
Sport News: जीव्हीएम, डीएम्स महाविद्यालयाला बेसबॉलमध्ये विजेतेपद

सेलिंगच्या नियोजनावर चर्चा-

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी गोवा यॉटिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी राज्यातील सेलिंग खेळाबाबत चर्चा केली. त्यांनी सेलिंगच्या पायाभूत विकासासाठी संघटनेने आखलेले नियोजन जाणून घेतले. संघटनेला उद्दिष्टप्राप्तीसाठी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष रेनर डायस, सचिव कीथ डिसोझा, उपाध्यक्ष सिद्धार्थ सातार्डेकर यांची, तसेच सेलर्सचे पालक अनुक्रमे डोनाल्ड कुएल्हो, डॉ. तेजश्री कोलवाळकर, कमांडर प्रशांत मेनन यांचीही उपस्थिती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com