Vasco News: इंधन गळतीची शेतजमिनीलाही झळ; पाण्‍याची टंचाई, दाबोळीवासीय संतप्‍त

स्‍थिती गंभीर : ऑईल कंपनी, आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापनाला धरले धारेवर
Vasco News
Vasco NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco News: व्हडलेभाट, चिखली - दाबोळी परिसरात आज इंधन गळतीचा अधिकच वास येऊ लागल्याने स्थानिकांनी झुआरी इंडियन ऑईल कंपनी व मुरगाव तालुका आपत्कालीन व्यवस्थापन समितीला धारेवर धरले. आपत्कालीन व्यवस्थापन समितीचा एकही प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याने मुरगाव तालुका आपत्कालीन व्यवस्थापन समिती उपाययोजना आखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे.

संतापजनक ः नऊ दिवस उलटले तरी गळतीचा शोध सुरूच

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश पाटील यांनी सांगितले, की संबंधित कंपनीच्या सीईओ शिवप्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार इंधनजन्य द्रवरूप पदार्थाची गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेली गळती वाहिनीतून नेमकी कुठून होते हे अद्याप समजलेले नाही. त्याचा शोध घेण्यासाठी यंत्र मागवण्यात आले आहे. जलवाहिनीच्या वर खडक असल्याने खोदाई करून शोध घेणे कठीण होत आहे. खास श्वानपथकही आणण्यात आले आहे. त्‍यातून हे इंधनसदृश्य द्रव कुठवर पोचले आहे याचा शोध घेतला जाणार आहे.

नागरिकांचे पाण्‍याविना हाल

  • व्हडलेभाट परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, इंधन गळती होऊन ते विहिरीच्या पाण्यात मिसळू लागले, तेव्हापासून आम्ही विहिरीचे पाण्याचा वापर पिण्यासाठी व जेवण करण्यासाठी करीत नाही.

  • या परिसरातील घरांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाची पाण्याची जोडणी नसल्याने सध्या ते इतरांकडून नळाचे पाणी घेत आहेत.

  • काही रहिवाशांच्या घरात पिण्याचे पाणी नसल्याने त्यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन समिती व झुआरी इंडियन ऑईल कंपनीने दररोज पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी पंच निलम नाईक यांनी केला आहे.

  • इंधन गळतीमुळे नागरिकांना होत असलेला श्वसनाचा त्रास लक्षात घेऊन या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका उपलब्ध करावी, अशी मागणी पंच नाईक यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com