गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक रमाकांत केसरकर यांचे निधन

केसरकर यांचा जन्म 11 जुलै 1937 रोजी झाला होता. विद्यार्थीदशेत असतानाच म्हणजे 1954 च्या दरम्यान ते गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय झाले होते.
गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक रमाकांत केसरकर यांचे निधन
गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक रमाकांत केसरकर यांचे निधनDainik Gomantak

मडगाव: गोवा मुक्ती चळवळीत भूमीगत राहून मोलाचे कार्य केलेले येथील स्वातंत्र्य सैनिक रमाकांत दामोदर केसरकर (84) यांचे वृद्धापकाळाने आज (5 नोव्हेंबर) पहाटे निधन झाले. आजच त्यांच्यावर मठग्रामस्थ हिंदूसभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र विक्रम यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. त्यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दुःख व्यक्त केले आहे.

त्यांच्या मागे पुत्र विक्रम व दामोदर, तसेच विवाहित कन्या तेजा विनायक डांगी व रूपा अमोल वेरेकर, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. केसरकर हे वृद्धापकाळाने मागचे काही महिने आजारी होते. आज पहाटे 4 च्या सुमारास त्यांचे देहावसान झाले अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयाकडून देण्यात आली. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच अन्य व्यक्ती हजर होत्या. त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी स्वातंत्र्य सैनिक वामन प्रभुगावकर, 18 जून समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर व समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक रमाकांत केसरकर यांचे निधन
गोव्यातील सर्वात वृद्ध महिलेचे वयाच्या 113 व्या वर्षी निधन

केसरकर यांचा जन्म 11 जुलै 1937 रोजी झाला होता. विद्यार्थीदशेत असतानाच म्हणजे 1954 च्या दरम्यान ते गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय झाले होते. उर्सेलीन आल्मेदा आणि विष्णू केसरकर यांच्या बरोबर ते भूमीगत राहून मुक्ती लढ्याचे काम करत असत. 15 ऑगस्ट 1955 या दिवशी मडगावात करण्यात आलेल्या सत्याग्रहात त्यांनी आनंद भिसे, विष्णू केसरकर, शशी बोन्द्रे, मोहन सावळ यांच्या बरोबर भाग घेतल्याने त्यांना पोलिसांनी अटक करून दोन दिवस डांबून ठेवले. तिथे त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली.

केसरकर गोवा मुक्तीपर्यंत म्हणजे 1961 पर्यंत या लढ्यात सक्रिय होते. या मुक्तीलढ्याला अंतिम रूप देण्यासाठी पीटर अल्वारीस यांनी आंगडी कारवार येथे जी शिबीरे आयोजित केली होती त्या शिबिरांना त्यांची हजेरी असल्याची. अल्वारिस यांच्या सूचनेप्रमाणे ते गोव्यात काम करत असत. याची कुणकुण पोर्तुगीज पोलिसांना कळल्यानंतर किमान 4 वेळा त्यांच्या घरावर धाड घालून त्याना अटक करण्याचा प्रयत्न झाला मात्र ते भूमीगत झाल्याने पोलिसांच्या हाती लागू शकले नव्हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com