Goa Murder Case: फ्री चिकनवरुन वाद! झाबोल - कुठ्ठाळीत ओडिशाच्या तरुणाचा खून, एक जखमी; दोघांना अटक

Cortalim Murder Case: फ्री चिकनवरुन संशयित आरोपी संतोष आणि प्रधान यांनी अनिल आणि झिहुसाया यांच्यावर चाकूहल्ला केला.
Goa murder case: One dead, one injured in violent fight
Odisha man killed in Goa over free chicken disputeDainik Gomantak
Published on
Updated on

कुठ्ठाळी: झाबोल येथे ओडिशाच्या तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आलीय, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. चाकूहल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सेंट अँथनी चिकन फार्ममध्ये शुक्रवारी (२१ मार्च) ही घटना घडली.

अनिल मुथामाझी (वय २१, रा. ओडिशा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, झिहुसाया मोंडल (वय ३९, रा. ओडिशा) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे. जखमी झिहुसाया याच्यावर बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी संतोष इंदर मल्लिक (वय ३२) आणि प्रधान नालिका मोंडल (वय ३५) (दोघेही रा. ओडिशा) या दोघांना अटक केली आहे.

Goa murder case: One dead, one injured in violent fight
Goa Drugs Case: बेकायदेशीर अमली पदार्थाविरोधात गोवा पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये! 85 हजारांच्या अमली पदार्थासह दोघांना अटक

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फ्री चिकनवरुन संशयित आरोपी संतोष आणि प्रधान यांनी अनिल आणि झिहुसाया यांच्यावर चाकूहल्ला केला. यात अनिल या तरुणाचा खून झाला आहे. तर, झिहुसाया हा गंभीर जखमी झाला आहे. झिहुसाया मोंडल याच्यावर बांबोळीत उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com