विदेशी नागरिकांची फसवणूक, बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

पर्वरी पोलिसांकडून पाच जणांना अटक
Fraud of foreign nationals, fake call center exposed by Porvorim police
Fraud of foreign nationals, fake call center exposed by Porvorim policeDainik Gomantak
Published on
Updated on

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून कर्ज मंजुरीच्या नावाखाली विदेशी नागरिकांची फसवणूक (Fraud) करणार्‍या पिळर्ण-बार्देश येथील बनावट कॉल सेंटरचा पर्वरी पोलिसांकडून (police) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी गुजरातमधील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट कॉल सेंटरची माहिती पर्वरी (Porvorim) पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकून पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Fraud of foreign nationals, fake call center exposed by Porvorim police
सत्तरीत वादळी वाऱ्यासह पाऊस, वाळपई-होंडा रस्ता बंद

दरम्यान, हणजुण पोलिसांनी, मोठ्या आवाजात संगीत पार्टी आयोजित करून आसपासच्या परिसरात ध्वनी प्रदूषण निर्माण केल्याबद्दल चौघांना अटक केली. यामध्ये मूळचा मुंबईचा रहिवासी असलेला हर्षित कांतारिया, तसेच वगाटोर येथील रहिवासी एलायनो परेरा आणि फरीद खान, आणि मूळचा दिल्लीचा रहिवासी करंग नारंग, यांचा यामध्ये समावेश आहे.

पोलिसांनी (Goa Police) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 7 वाजता त्यांना फोन आला की वागातोर येथील बीच (Goa Beach) क्लबमध्ये मोठ्या आवाजात म्युझिक पार्टी सुरू असल्याची तक्रार मिळाली होती. डीवायएसपी उदय परब यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला अटक केली. दरम्यान पोलिसांनी वाद्यांसह साहित्यही जप्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com