Sadetod Nayak: धर्मगुरूंनी तारतम्य बाळगावे : फा. व्हिक्टर फेर्राव

आमचे गोंयकारपण जपूया : फा. फेर्राव
fr victor ferrao
fr victor ferraoDainik Gomantak
Published on
Updated on

Sadetod Nayak: धर्मपीठावरून बोलताना धर्मगुरूंनी तारतम्य बाळगणे व जबाबदारीने भाष्य करणे गरजेचे आहे. जो प्रकार घडला तो दुर्दैवीच आहे. आपल्या आवेशपूर्ण बोलण्याचा समाजावर काय परिणाम होईल याचा विचार व्हावा, असे फा. व्हिक्टर फेर्राव यांनी सांगितले. ते संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान फा. फेर्राव म्हणाले, काही ख्रिस्ती धर्मगुरूंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सर्वच धर्मगुरूंना दोषी ठरवू नये.

त्यांच्या या विधानांबाबत वडीलकीच्या भूमिकेतून आर्चबिशपांनी कान टोचले आहेत. त्यामुळे आमचा धार्मिक सलोखा, संस्कृती आणि गोंयकारपण अबाधित ठेवणे गरजेचे आहे.

fr victor ferrao
Vijai Sardesai: ‘तो’ प्रस्ताव का फेटाळला? सरदेसाईंचा सवाल

पूर्वी जर काही आक्षेपार्ह घटना घडल्या तर गावकारी पद्धतीतून त्या समस्येचे निवारण केले जायचे. मात्र, आता प्रत्येकाच्या हातात तंत्रज्ञान आले आहे. मोबाईल, व्हिडिओ, समाजमाध्यमांच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या प्रमाणात वक्तव्ये प्रसारित होतात.

परंतु या तंत्रज्ञानाचा वापर समाजहितासाठी, योग्य मार्गदर्शनासाठी कशा पद्धतीने करता येईल यासंबंधात गांभीर्याने विचारमंथन करून योग्य ती पावले उचलण्याची आवश्‍यकता असल्याचे मत फा. फेर्राव यांनी व्यक्त केले.

"आपण प्रवचन देताना विनम्रपणे बोलणे गरजेचे असते. बोलण्याला अर्थ असणे, त्यात विचार असणे, तसेच तथ्याच्या आधारावर बोलणे गरजेचे आहे."

"पाद्रींच्या या विधानाने ख्रिस्ती बांधवांची मनेदेखील दुखावली आहेत. आम्ही गोमंतकीय एक आहोत. आम्ही शांंतताप्रिय नागरिक असल्याने धार्मिक सलोखा बिघडणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे."

- फा. व्हिक्टर फेर्राव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com