G20 Meet in Goa: गोव्यात G20 ची चौथी एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपची मीटिंग 19 जुलैपासून

1500 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार
Goa G20 Summit 2023
Goa G20 Summit 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

G20 Meet in Goa: जी-20 देशांची चौथी एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुप (ETWG) ची बैठक 19 जुलै ते 21 जुलै 2023 या काळात गोव्यात होणार आहे. यात G20 देश, विशेष आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 1500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील, असे कळते.

ETWG ची स्थापना ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत उर्जेसमोरील जागतिक आव्हानांना तोंड देण्याच्या उद्देशाने झाली आहे. जी G20 देशांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्था आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर भागधारकांना ही संघटना एकत्रित आणते.

Goa G20 Summit 2023
First Gym For Women in Goa: 'या' गावात सुरू झाली महिलांसाठीची गोव्यातील पहिली व्यायामशाळा

या बैठकीत विशेष निमंत्रितांमध्ये आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था सहभागी होतील. ऊर्जा आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमधील एक महत्वाचे पाऊल म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे.

शाश्वत आणि सर्वसमावेशक ऊर्जेचे भविष्य साध्य करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींच्या देवाणघेवाणीसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून चर्चा आणि सहयोगासाठी ही बैठक महत्वाची असणार आहे.

बैठकीत मंत्री,धोरणकर्ते, तज्ज्ञ, उद्योजक सहभागी होतील. या बैठकीत उर्जा वापराबाबतचा एक कृती कार्यक्रम ठरेल.

Goa G20 Summit 2023
Rawanfond Accident: रावणफोंड येथे ट्रकच्या धडकेत पादचारी ठार; ट्रकचालक फरार

गोव्यातील G20 चे नोडल अधिकारी संजीथ रॉड्रिग्स म्हणाले की, फलदायी चर्चा आणि ऊर्जा आव्हानांना तोंड देण्यासाठी कृती करण्याची अनोखी संधी या बैठकीतून मिळते. पृथ्वीच्या फायद्यासाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक ऊर्जा उपाय सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत एकत्र काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

प्रतिनिधींना शहराच्या अनोख्या वातावरणात डुंबण्याची आणि संमेलनादरम्यान समृद्ध वारसा अनुभवण्याची संधी मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com