Banastarim Mercedes Accident ला चार महिने उलटले! पोलिसांकडून अजूनही आरोपपत्र दाखल नाहीच...

फॉरेन्सिक अहवाल प्रलंबित असल्याचा दावा
Banastarim Mercedes Accident
Banastarim Mercedes AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Mercedes Accident: बाणस्तारी येथील पुलावर झालेल्या मर्सडीज कारच्या भीषण अपघाताला 4 महिने उलटले आहेत. तरीही या प्रकरणात अद्याप पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यात यश आलेले नाही.

या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. फॉरेन्सिक अहवाल प्रलंबित असल्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यात विलंब झाल्याचे सांगितले जात आहे.

रक्ताच्या डागांचे नमुने, डीएनए नमुने, कॉल डिटेल्स आणि इतर काही गोष्टी पुण्यातील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल) आणि वेर्णा येथील स्टेट एफएसएलकडे पाठविण्यात आली होती, परंतु अद्याप अहवाल येणे बाकी आहे.

प्रलंबित फॉरेन्सिक अहवाल हे तपास पूर्ण होण्यास उशीर होण्याचे कारण असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, CFSL पुणेने आधीच गुन्हे शाखेला (CB) कळवले होते की विश्लेषणास तीन महिने लागू शकतात.

Banastarim Mercedes Accident
CM Pramod Sawant: प्रत्येक विश्वकर्मा लाभार्थ्याला 15 डिसेंबरपुर्वी मिळणार 17500 रूपये; कौशल्य प्रशिक्षण देणार

दरम्यान, आमच्याकडे अजून दीड महिना बाकी आहे. आणखी उशीर झाल्यास, आम्ही चाचणीचे निकाल लवकर काढण्यासाठी CFSL ला स्मरणपत्र लिहू," अशी माहिती स्थानिक इंग्रजी प्रसारमाध्यमांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या अपघातावेळी मेघना सावर्डेकर नाही तर तिचा पती श्रीपाद सिनाई सावर्डेकर उर्फ ​​परेश हा मर्सिडीज बेंझ चालवत होता, हे आतापर्यंतच्या तपासात सिद्ध झाले आहे.

हे दाम्पत्य प्रभावशाली घराण्यातील असल्याच्या कारणावरून पोलिसांना या प्रकरणात लपवाछपवीच्या आरोपांना सामोरे जावे लागले आहे.

6 ऑगस्ट रोजी हा अपघात झाला होता. फोंडा येथे 6 ऑगस्ट रोजी रोटरी क्लबच्या पार्टीत हे दाम्पत्य सहभागी झाले होते.

पार्टीतील बहुतेक जण मद्यधुंद होते तसेच आरोपींसह इतर कार रेसिंगमध्येही सहभागी होत होते. पार्टीनंतर कार रेसिंग करण्यातून हा अपघात झाल्याची चर्चा आहे.

Banastarim Mercedes Accident
Nilesh Cabral: गोव्यातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी पैसेच नाहीत! केंद्र सरकार मदत करेल असे वाटले होते...

अपघातानंतर आठ तासांनी म्हार्दोळ पोलिसांनी परेश याला दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल अटक केली. क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहे. या पथकात नऊ सदस्य आहेत.

दरम्यान, गणेश लमाणी नावाच्या डमी कार चालकाला सादर करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आम आदमी पार्टी (आप) गोवाचे अध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com