गोवा राज्यात नोकरीचा प्रश्न तीव्र असल्याने राज्यातील युवक नोकरीसाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र सामान्य आहे. याचाच फायदा घेत चार युवकांना सुमारे 4.40 लाखांना फसवले असल्याची घटना समोर आली आहे.
(Four Goa youths cheated on the pretext of jobs in foreign )
मिळालेल्या माहितीनुसार विदेशात नोकरी देतो असे भासवत हळदोणा व म्हापसा येथील दोघांनी चार युवकांकडून सुमारे 4.40 लाख रुपये उकळले असल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच गोव्यातील युवकांना विदेशात नोकऱ्या देण्याच्या निमित्ताने फसवणूक होत असल्याचं म्हटले होते. अशीच घटना आज राज्यात घडल्याचा प्रकार समोर आला आहे.
या फसवणूक प्रकरणी दोन व्यक्तींना अटक केली आहे. आर्थर केन्नी रा. हळदोणा व सिद्धार्थ कांबळी रा. म्हापसा अशी या दोघांची नावे आहेत. व आणखी काही जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामूळे गोव्यातील युवकांच्या फसवणूकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. असे असले तरी ही घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.