Quelossim News: केळशी माजी सरपंचांसह तिघांना तीन वर्षे निवडणूक लढण्यास बंदी

Quelossim Panchayat: नसलेल्‍या घरांना नंबर दिल्‍याचा आरोप; पंचायत अतिरिक्त संचालक यांचा आदेश
Quelossim Panchayat: नसलेल्‍या घरांना नंबर दिल्‍याचा आरोप; पंचायत अतिरिक्त संचालक यांचा आदेश
No Election Canava
Published on
Updated on

केळशी येथील मूळ मिठागर असलेल्‍या जागेवर उभारलेल्‍या बेकायदा रेस्‍टॉरंटला फायदा व्‍हावा यासाठी मूळ जागेत घरे नसतानाही घर नंबर दिल्‍याचा आरोप असलेले केळशीचे माजी सरपंच दियोनिजियाे डायस, माजी उपसरपंच फिलिसिया फर्नांडिस आणि माजी पंच लुमेना रॉड्रीगीस या तिघांवर अतिरिक्‍त पंचायत संचालक संगीता नाईक यांनी दोषी ठरवून पुढची तीन वर्षे पंचायत निवडणूक लढविण्‍यास बंदी घालण्‍याचा आदेश दिला.

अतिरिक्‍त पंचायत संचालक संगीता नाईक यांनी १८ जून रोजी हा निवाडा दिला. या तिन्‍ही पंच सदस्‍यांविरोधात कुडतरी येथील पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते आॅजवल्‍ड फर्नांडिस यांनी तक्रार नोंदविली होती.

सुरुवातीला या तिन्‍ही पंचसदस्‍यांविरोधात भ्रष्‍टाचाराचा आरोप करून फर्नांडिस यांनी लोकांयुक्‍ताकडे तक्रार दिली होती. लाेकायुक्‍त कार्यालयाने १५ सप्‍टेंबर २०२० रोजी हे प्रकरण हातावेगळे करून ‘एसीबी’ला या प्रकरणाचा तपास करून पंचायत संचालकांना अहवाल देण्‍याचा आदेश दिला होता. ‘एसीबी’ला या तक्रारीत तथ्‍य आढळून आल्‍याने त्‍यांनी पंचायत संचालकासमोर अहवाल सादर केला होता.

या तक्रारीनुसार केळशी येथील १५०/४ व ६ या जागेत एका बांधकामात बदल करून दुमजली तात्‍पुरत्‍या स्‍वरुपाचे बांधकाम उभारण्‍यासाठी पंचायतीकडे अर्ज करण्‍यात आला होता. या बांधकामाला पंचायतीने ‘नाहरकत’ दाखला दिला हाेता.

त्‍यावेळी वरील तिन्‍ही पंच सदस्‍य पंचायतीत कार्यरत होते. ज्‍या जागेत हे बांधकाम बांधण्‍यासाठी अर्ज केला होता, ती जागा मुळात मिठागर असून ज्‍यावेळी या जागेत दाेन बांधकामांना घर नंबर देण्‍यात आले, तेव्हा त्‍या जागेवर एकही घर नव्‍हते, असा दावा तक्रारदार ऑजवल्‍ड फर्नांडिस यांनी केला होता.

Quelossim Panchayat: नसलेल्‍या घरांना नंबर दिल्‍याचा आरोप; पंचायत अतिरिक्त संचालक यांचा आदेश
Quelossim: राज्यात अपघातांचे सत्र संपेना; दुचाकी - बस अपघातात फोंड्याचा युवक ठार

ऑजवल्‍ड फर्नांडिस, याचिकादार

मी या प्रकरणी २०२० मध्‍ये लोकायुक्‍ताकडे तक्रार दाखल केली होती. त्‍यानंतर या प्रक़रणाची ‘एसीबी’ने चौकशी करून पंचायत संचालनाकडे आपला अहवाल सादर केला होता. मात्र पंचायत संचालनालयाकडे या प्रकरणाची सुनावणी लांबली आणि आता या प्रकरणाचा निकाल लागला आहे. मात्र, ज्‍यांच्‍या विरोधात मी तक्रार दिली होती. ते पंचायतीत कार्यरत असताना जर हा निर्णय आला असता तर ते अपात्र ठरले असते. ही सुनावणी लांबल्‍यामुळे दोषींना जी शिक्षा त्‍यांच्‍या कार्यकाळात व्‍हायला हवी होती. ती मात्र होऊ शकली नाही याबद्दल खेद वाटतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com