Former MLA Mickky Pacheco: मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा? असं का म्हणाले माजी आमदार मिकी पाशेको

Overseas Citizen of India: ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) प्रमाणपत्राविषयी काढलेल्या शुद्धिपत्रकाची माहिती गोमंतकीयांपासून लपवून ठेवली.
Former MLA Mickky Pacheco
Former MLA Mickky PachecoDainik Gomantak
Published on
Updated on

Overseas Citizen of India: ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) प्रमाणपत्राविषयी काढलेल्या शुद्धिपत्रकाची माहिती गोमंतकीयांपासून लपवून ठेवली. तसेच मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे पोर्तुगीज पारपत्र असल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार मिकी पाशेको यांनी केली.

शनिवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सिक्वेरा यांनी २००१ मध्ये पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केली आहे, त्यामुळे ते विदेशी आहेत. एखादी व्यक्ती पोर्तुगालमध्ये जन्माला येते, तेव्हा जन्माच्या तारखेपासूनच त्या व्यक्तीची पोर्तुगीज नागरिक म्हणून नोंद होते. मंत्री सिक्वेरा यांच्याकडे पोर्तुगीज पारपत्र आहे. त्याविषयीचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे सिक्वेरा यांना सरकारने मंत्रिपदावरून हटवावे.

Former MLA Mickky Pacheco
British Citizen Arrest In Goa: टेरेसवर टोमॅटोसह गांजाची लागवड! गोव्यात ब्रिटीश नागरिकाला अटक

पासपोर्ट जमा करा!

मंत्री सिक्वेरा यांनी २००१ साली पोर्तुगीज नागरिकत्व घेतले. त्यानंतर त्यांनी गोव्यातून अनेकदा निवडणूक लढविल्याचे दाखले मिकी पाशेको यांनी दिले. ज्याप्रमाणे गोमंतकीय जनतेचे पारपत्र केंद्र सरकारने जमा करून घेतले, त्याप्रमाणेच मंत्र्यांचेही पारपत्र जमा करून घेऊन त्यांना ‘ओसीआय’ द्यावे, अशी मागणी पाशेको यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mapusa Road Repair
Car Chase
MLA Vijai Sardesai Court Warning
Damu Naik slams Mauvin Godinho
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com