Goa News: राज्यात पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्याला येऊ लागले आहेत. गोव्यातील दूधसागर धबधबा हा पर्यटकाचं आकर्षण आहे. पर्यटक दरवर्षी मोठ्याप्रमाणावर दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून दूधसागरवरील जीटीडीसीच्या ऑनलाईन काउंटवरवरुन वाद उफळला आहे.
दूधसागरवरील जीटीडीसीची वेबसाईट बंद करण्याच्या जीप असोसिएशनच्या मागणीला सावर्डेचे माजी आमदार आणि मंत्री दिपक पावसकरांनी आज (22 ऑक्टोबर) पाठिंबा जाहीर केला. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा केल्यानंतर पाऊसकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
जीटीडीसी’चा ऑनलाईन काउंटर जोपर्यंत बंद केला जात नाही व आमची वेबसाईट आम्हाला परत दिली जात नाही, तोपर्यंत दूधसागर पर्यटन हंगाम चालू करण्यास आमचा ठाम विरोध असेल, असा इशारा दूधसागर जीप टूर असोसिएशनने सरकारला दिला होता.
दूधसागर जीप टुर असोसिएशन वेबसाईट आणि ऑनलाईन काउंटर संदर्भात जी मागणी करीत आहे ती मागणी बरोबर असून माझा असोसिएशनला पूर्ण पाठींबा असल्याचे माजी मंत्री दीपक पाऊसकर यावेळी म्हणाले.
दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) पर्यटन व्यवसायाची वेबसाईट आहे, ती आमची वेबसाईट आम्हांला परत द्यावी. या ठिकाणी जीटीडीसीचा हस्तक्षेप नको. सरकारला जो काही कर आहे, तो आम्ही भरण्यास तयार आहे, असे जीप टूर ऑपरेटर्संनी सांगितले. आम्हांला जिटीडीसीचा हस्तक्षेप नको, आम्हांला आपण सहकार्य करावे, अशी मागणी अध्यक्ष निलेश वेळीप व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.