Margao municipal council corruption
सासष्टी: मडगाव नगरपालिकेत वेगवेगळ्या प्रकरणात जो गैरप्रकार चालू आहे, त्या विरोधात मडगावचे नागरिक तोंड उघडणार का? असा प्रश्न माजी नगराध्यक्ष, शेडो कौन्सिलचे निमंत्रक व कॉंग्रेस नेते सावियो कुतिन्हो विचारत आहेत. गोव्यात चाललेला भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत एका बाजूने सांगत आहेत व त्यांच्याच पक्षाच्या हातात असलेली मडगाव नगरपालिका भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे, त्यावर कोणीही कारवाई करत नाही, असे सावियो कुतिन्हो यांचे म्हणणे आहे.
योगेश शेटकर या कारकुनाने फेस्त फेरीचे लाखो रुपये गिळंकृत केले आहेत. त्याला केवळ ‘मेमो’ देण्यापलिकडे त्याच्यावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. शेटकर प्रकरणात नगरपालिका गंभीर नसल्याचेच स्पष्ट होत असल्याचेही कुतिन्हो याचे म्हणणे आहे.
नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी पत्रकारांना सांगितले आहे, की शेटकर यांना अटक करण्यास पोलिसांना सांगितले आहे. त्याच बरोबर नगरपालिकेने त्याच्याकडून येणे असलेले जवळ जवळ १४ लाख रुपये वसूल करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे.
मात्र नगरपालिका त्याच्याकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी टाळत आहे. काही लोकांच्या मते शेटकर यांना राजकीय संरक्षण मिळत आहे. नगरपालिका कायद्याप्रमाणे शेटकर यांना एव्हाना निलंबित करायला हवे होते. कुठल्याही परिस्थितीत त्याच्याकडून हे पैसे वसूल करुन घ्यायला हवे होते. यापूर्वी सोपो गोळा करणाऱ्या कंत्राटदाराकडूनही पैसे वसूल करून घेण्यास नगरपालिकेने तत्परता दाखवलेली नाही, असेही सावियो कुतिन्हो सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.