शेवटी रााजकारणासाठी सत्यवचन भंगले!

गोवा सरकारला बदनाम करण्याचा ठेका मी घेतलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी या माहितीचा आधार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे तसेच राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे
गोव्याचे माजी आणि मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक
गोव्याचे माजी आणि मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे माजी आणि मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी गोव्यात कोविड (Covid -19) काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत गंभीर आरोप केल्यानंतर मंगळवारी राज्यात खळबळ उडाली होती. विरोधी पक्षांनी निदर्शने, मोर्चे काढून सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, या प्रकरणाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेऊन मलिक यांचे कान पिळल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर मलिक यांनी याप्रश्‍नी लगेच घुमजाव केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रश्‍नी यू-टर्न घेताना सत्यपाल मलिक म्हणाले, की मी मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भ्रष्टाचार केल्याचा उल्लेखच केला नव्हता. गोवा सरकारला बदनाम करण्याचा ठेका मी घेतलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी या माहितीचा आधार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे तसेच राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी ठासून सांगितले.

गोव्याचे माजी आणि मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक
सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीमागील गुपीत

सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या खळबळजनक मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटानंतर भाजपच्या काही नेत्यांनी काल त्यांच्या विधानासंदर्भात तोंड उघडले आणि आरोपांचे खंडनही केले. मंगळवारी दिवसभर विरोधकांनी त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा आधार घेऊन भाजप सरकारवर टीकेची झोड उठवत आंदोलन छेडले. यावर मुख्यमंत्री तसेच भाजपने कोणतेच स्पष्टीकरण दिले नव्हते. पण या प्रकरणाची दखल घेऊन केंद्र सरकार तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मलिक यांची कानउघाडणी केल्याचे समजते. कालपर्यंत मलिक यांनी मुलाखतीत केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत भाजपच्या गोव्यातील वरिष्ठ नेत्यांनी कोणतेच भाष्य केले नव्हते. मात्र, काल भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजपचे अधिकृत मत मांडले.

...तर मलिक यांनी राजकारणात यावे : सदानंद शेट तानावडे

मलिक यांची मुलाखत घेताना त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार करून मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यांनी मुख्यमंत्री तसेच भाजप सरकारवर केलेले आरोप चुकीचे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत. टाळेबंदीच्या काळात अन्न पुरवठ्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच त्याचे वितरण करण्यात आले. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप निराधार आहेत. राजभवनची नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला होता, त्यावेळी मलिक हे राज्यपाल होते. मात्र, त्यांनी त्याला संमती दिली नव्हती. मलिक यांना जर राजकारणच करायचे असेल तर त्यांनी घटनात्मक पदाचा राजीनामा द्यायला हवा.

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

गोव्याचे माजी आणि मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक
माजी गोवा राज्यपाल 'सत्यपाल मलिक' यांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका

बूंद से गई वो हौद से नही आती...

सत्यपाल मलिक यांनी भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत घेतलेल्या या यू-टर्नला आता काहीच अर्थ नाही. ‘बूँद से गई वो हौद से नही आती’, असा हा प्रकार आहे. त्यांचे वक्तव्य हे रेकॉर्डेड आहे. त्यामुळे त्यांच्यावर स्पष्टीकरणासाठी दबाव आणला असणार, हे साहजिकच आहे. मात्र, या स्पष्टीकरणाला काहीही अर्थ नाही. ते सत्य बोलून गेले आहेत.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

सत्यपाल मलिक यापूर्वीच सत्य बोलून गेले आहेत. त्यांनी नव्याने दिलेल्या स्पष्टीकरणात मुख्यमंत्र्यांवर आरोप केले नसल्याचे म्हटले आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की हे संपूर्ण सरकार भ्रष्टाचारी आहे आणि त्यांची पार्टी भ्रष्टाचारी जनता पार्टी आहे, हे सिद्ध झाले आहे. मलिक यांच्यावर दबाव आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.

- विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड पक्ष.

विरोधकांचा बार फुसका

भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. भाजप सरकारने कोविड काळात गोव्यात चांगले काम केले आहे. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भ्रष्टाचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांवर विधान केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या विधानांवरून विरोधकांना काहीच साध्य करता येणार नाही, असे सी. टी. रवी यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com