गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतDainik Gomantak

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची दिल्ली वारी

‘गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा आपल्यालाच सेवेची संधी मिळेल असे वाटते'
Published on

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा केली. ‘गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा आपल्यालाच सेवेची संधी मिळेल असे वाटते,‘ असा विश्वास एकीकडे व्यक्त करतानाच, भाजप अपक्ष व प्रादेशिक पक्षांबरोबर युती करून पुन्हा सरकार बनवेल, असाही सावध पवित्रा सावंत यांनी घेतला.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
मतमोजणी दिवशी मद्यविक्री बंदी: गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

सावंत यांनी मोदींना भेटल्यावर सांगितले, की गोव्यात भाजपची सत्ता कायम राहील याबाबतच्या शक्याशक्यतांची माहिती आपण पंतप्रधानांना दिली. त्यांनी सांगितले, की आम्ही सर्वाधिक जागा जिंकून गोव्यात पुन्हा सरकार स्थापन करू. मला वाटते की गोवेकर जनता मला पुन्हा (मुख्यमंत्री या रूपात) सेवा करण्याची संधी देतील. या पदासाठी भाजप नेतृत्वाने माझी उमेदवारी जाहीर केली असेल तर निश्चितपणे तसेच होईल. कारण भाजप हा जसे बोलतो तसेच करणारा पक्ष आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला 20 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवित असल्याचे सावंत यांनी सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
कांपाल मैदानाशेजारी दोन गाड्यांना भीषण आग

आम्हाला पाठिंबा देणारा पक्ष आमच्या नेतृत्वाच्या निवडीबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही. 2017 मध्ये व आताही ‘मगोप’ भाजपबरोबर नव्हता. प्रादेशिक पक्ष, अपक्षांच्या मदतीने राज्यात सरकार बनवेल. केंद्रीय नेतृत्वही या नेत्यांशी चर्चा करत आहे. मागील निवडणुकीत गडकरी यांनी मगोप, गोवा फॉरवर्ड व अपक्षांना भाजपकडे खेचून घेतले होते.

प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com