वाघांबाबात आपल्याला सखोल माहिती: वनमंत्री विश्वजित राणे

'वाघांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी'
Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomnatak
Published on
Updated on

पर्ये: आपल्याला पट्टेरी वाघाबाबत सखोल माहिती आहे. आपण गेल्या बऱ्याच काळापासून अनेकदा व्याघ्रक्षेत्रात जाऊन बरेच दिवस तिथे राहिलो आहे आणि वाघांचे निरीक्षण करून बरीच माहिती मिळवली आहे. वाघांचे संरक्षण करण्याची आपल्याला माहिती असून, ती आपली जबाबदारी आहे. त्याबद्दल आपल्याला कोणी नाहक सल्ले देऊ नयेत. आपल्यासाठी सत्तरीतील लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे वनमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

केरी सत्तरीतील बाहेरीलवाडा येथे हनुमान जयंतीनिमित्त एका विशेष कार्यक्रमात वनमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे, श्री हनुमान देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक दीपक नार्वेकर, स्थानिक पंच सदस्य लक्ष्मण गावस, समितीचे सचिव संजय सावळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. दिव्या राणे यांनी पुढील पाच वर्षांच्या काळात पर्ये मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला जाईल, असे सांगितले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बाहेरीलवाडा येथील ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. यात महादेव म्हालकर, बाबली म्हालकर, रामा सावळ, लक्ष्मण सावळ, रामा गाड, गोपीनाथ गाड, यशवंत गावस, शिवनाथ गावस, जयदेव पार्सेकर, लक्ष्मण गावस, तुळशीदास गावस, अर्जुन नार्वेकर, तुळशीदास च्यारी, पांडुरंग परब, श्रीकांत नाईक, राजाराम म्हालकर व चंद्रकांत नारूलकर यांचा समावेश होता.

यावेळी दीपक नार्वेकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. सिध्देश गावस यांनी सूत्रसंचालन तर संजय सावळ यांनी आभार व्यक्त केले.

या हनुमान जयंती निमित्त सकाळी विविध धार्मिक विधी, संध्याकाळी दिंडीच्या मिरवणुकीत पालकी उत्सव तर रात्री पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोग झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com