Goa Coast Security: गोव्यातील किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लाईफगार्ड्सची घेणार मदत

वन विभागाचा उपक्रम; विविध विभाग, संघटनांच्या संयुक्त प्रयत्नांतून किनाऱ्यांचे संवर्धन
Goa Coast Security
Goa Coast SecurityDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Coast Security: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील अवैध प्रकार थांबावेत, किनाऱ्यांवर वाहने चालवू नयेत आणि एकुणच किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

त्यानुसार आता राज्याचा पर्यटन विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, दृष्टी जीवरक्षक, पर्यटक पोलिस, शॅक मालक आणि स्वयंसेवी संस्था यांची मदत यात घेण्यात येणार आहे. सागरी जैवविविधतेच्या संरक्षणासह किनारपट्टींवरील अवैध कारवायांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हे विभाग वन विभागाला मदत करतील.

मुख्य वनसंरक्षक सौरभ कुमार यांच्या हवाल्याने इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. सौरभ कुमार यांनी म्हटले आहे की, सर्व विभागांद्वारे एक सुव्यवस्थित संयुक्त व्यापक जनजागृती कार्यक्रम आखला जात आहे.

लाइन विभाग, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ संस्था आणि लोकसहभाग याद्वारे राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर सुरक्षितता, समृद्ध सागरी जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी प्रयत्न केला जात आहे.

Goa Coast Security
स्वच्छतागृहाच्या बोर्डवर सुप्रसिद्ध चर्चचा फोटो; गोव्याच्या Manohar International Airport वरील प्रकाराने संतापाची लाट

राज्याच्या वनविभागाने गेल्या डिसेंबरमध्ये प्रथमच गोव्याची किनारपट्टीची दोन मरीन रेंजमध्ये विभागणी केली होती. समुद्रकिनाऱ्यांवर वाहन चालवण्यासारख्या उल्लंघनांपासून गोव्याच्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी दूत म्हणून काम करण्यासाठी वन विभाग आता वेगवेगळ्या घटकांना जोडण्याच्या प्रक्रियेत आहे.

या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये, या विभागांसमवेत दोन बैठका झाल्या असून लवकरच तिसरी बैठक होणार आहे. सर्व विभागातील प्रभावी आणि कार्यक्षम समन्वयावर भर देण्यावर या बैठकीत चर्चा झाली होती. सागरी संरक्षणासाठी एक मानक प्रोटोकॉल असावा, यावरही बैठकीत एकमत झाले होते.

दरम्यान, अधिकाधिक स्वयंसेवक नेमण्याचा प्रयत्न केला जात आहे. समुद्रकिनाऱ्यांवर वाहन चालवण्यास सक्त मनाई आहे. त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष दिले जाईल.

Goa Coast Security
Transfer Of Agriculture Land: ...अन्यथा गोमंतकीयांना स्वतःसाठी इंचभर जमीन शिल्लक राहणार नाही- खलप

सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट एज्युकेशन आणि वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटी यासारख्या संस्थांनीही यात सहभाग घेतला आहे.

दरम्यान, वनविभागाने प्रवाळ आणि खारफुटीच्या संरक्षणासाठी, सीआरझेड व्यवस्थापनासाठी आणि सागरी प्राण्यांच्या संरक्षणासाठी, कासव संवर्धन प्रकल्पाला अधिक बळकट करण्यासाठी मरीन रेंजेस स्थापन केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com