बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तुयेत वनखात्याचा पिंजरा

त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याने तुये परिसरात पिंजरा ठेवला आहे.
Leopards
LeopardsDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पार्से येथील ज्ञानेश्वर पोळजी या युवकावर बिबट्याने हल्ला केला. त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याने तुये परिसरात पिंजरा ठेवला आहे.

दोन दिवसांपूर्वी कामावरून येत असताना ज्ञानेश्वर या युवकावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तुये पंचायत इमारतीजवळच्या मुख्य रस्त्यावर धावत्या दुचाकीवर झडप घेऊन ज्ञानेश्वर पोळजी या युवकाच्या पायाला चावा घेतला होता.

(Forest cage in Tuyet for leopard control)

Leopards
दूधसागर धबधबा पर्यटक टॅक्सीसाठी बंद

सुदैवाने ज्ञानेश्वर गाडीवरून पडला नसल्याने मोठी दुर्घटना टळली. त्याने जोरदारपणे आपला पाय बिबट्याच्या जबड्यातून हिसकावून घेतला. आणि तसाच तो तुये इस्पितळात उपचारासाठी गेला. या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आणि सूचना स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी वन खात्याकडे केली होती. त्यानुसार वन खात्याने तुये परिसरात सापळा ठेवला आहे.

दरम्यान, मांद्रे परिसरातही बिबट्याचे दर्शन दिवसाढवळ्या झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तुये येथील सामाजिक कार्यकर्ते उदय मांद्रेकर यांनी सांगितले,की केवळ पिंजरे टाकून बिबट्या सापडणार नाही. तर बिबटा कोणत्या बाजूने येतो, कुठे जातो, त्याची चाल काय आहे, याचा अभ्यास करून सापळा रचावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com