Black Magic in Goa : भोमवाडा-पालयेत विदेशी पर्यटक करताहेत जादूटोण्याचे प्रकार; स्थानिकांनी डाव उधळला

काही पर्यटकांच्या वर्तणूकीमुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे
Black Magic in Goa
Black Magic in GoaDainik Gomantak

Black Magic in Goa: निसर्गसमृद्धीने नटलेल्या गोव्याचे फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकांनाही आकर्षण आहे. त्यामुळेच परदेशी पर्यटकांचे भारतातील गोवा हे आवडते ठिकाण बनले आहे. इथे हर तऱ्हेचे पर्यटक पाहायला मिळतात.

Black Magic in Goa
Bus Accident: कमानपाटा तुटून बस उलटली शेतात

परंतु काही पर्यटकांच्या वर्तणूकीमुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार भोमवाडा- पालये इथे घडला आहे. रात्रीच्या अंधारात काही विदेशी पर्यटक काळे कपडे घालून, दिवे लावून एके ठिकाणी काळ्या जादूचा सराव करत असल्याचे दिसून आले. याबाबत माहिती मिळतात स्थानिक पांच आणि पालयेमधील तरुणांनी घटनास्थळी जात हा सर्व प्रकार उधळून लावला. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

काळ्या जादूचे प्रकार करणाऱ्या तरुणीला या सर्व गोष्टी करण्यासाठी कुणाची परवानगी घेतली किंवा परवानगी घेतली का असे विचारले असता तिच्याकडे काहीच उत्तर नव्हते. तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांनी हळूहळू तिथून पळ काढायला सुरुवात केली.

हा प्रकार गोव्यात पहिल्यांदाच घडला नसून असे प्रकार याआधीपासून गोव्यात होत आहेत. पैसे कामावण्याचे एक साधन म्हणून काहीजण जादूटोण्याचे प्रकार करतात दिसतात. पोलीस मात्र याबाबत कोणतीच कारवाई का करत नाहीत असा सवाल लोकांमधून उपस्थित होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com