SCO Summit 2023 : बाणावली येथे आज गुरुवारपासून शांघाय सहकार्य संघटनेची परिषद सुरू आहे. या परिषदेत चीन, पाकिस्तान, रशियासह इतर सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो गोव्यात दाखल झाले आहेत.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो तब्बल 12 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला भेट देणारे पहिले परराष्ट्रमंत्री ठरले आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिनी रब्बानी खार भारत भेटीवर आल्या होत्या.
दरम्यान, भारतात पोहोचताच बिलावल यांनी पहिलं ट्विट केले आहे. "शांघाय सहकार्य संघटनेची परिषदेच्या निमित्ताने मी गोव्यात आलोय. मी पहिल्यांदा रुस देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर मी उझबेकिस्तान देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. यानंतर परिषदेत सहभागी सर्व परराष्ट्रमंत्र्यांसोबत मी भोजनाचा आस्वाद घेईन तसेच मुलाखतीही देणार आहे." अशी माहिती त्यांनी व्हिडीओ ट्विट करत दिली.
सर्वांचे लक्ष भारत-पाकिस्तानच्या बैठकीवर आहे. तब्बल 12 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला भेट देणारे बिलावल भुत्तो पहिले परराष्ट्रमंत्री ठरले आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिनी रब्बानी खार भारत भेटीवर आल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.