Goa art exhibition, Majorda gallery event, Goan artist showcase
Goa art exhibition, Majorda gallery event, Goan artist showcaseDainik Gomantak

Footprints and Frames: मुंबई ते गोवा मार्गावरील कथा पहा चित्रांमध्ये! नॉस्टेल्जीयाच्या पाऊलखुणा

David Flaviano Fernandes: नेपथ्य आणि प्रदर्शनीय रचना यांचा त्यांचा सखोल अनुभव त्याच्या चित्रांमधील दृश्यबंध, परस्पेक्टिव्ह आणि कथनात्मकता यातून प्रत्ययाला येतो.
Published on

'फुटप्रिन्टस आणि फ्रेम्स' हे चित्रप्रदर्शन माजोर्डा येथील कार्पे दिएम आर्ट गॅलरीमध्ये, शुक्रवार, 18 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. संपूर्ण भारत आणि त्यापलीकडे केलेल्या आपल्या सर्जनशील प्रवासाचे संचित डिझायनर, शिक्षक आणि कलाकार असलेल्या डेव्हिड फ्लेव्हियानो फर्नांडिस यांनी आपल्या चित्रांमध्ये रंगवले आहे. गॅलरीत संध्याकाळी 7 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. हे प्रदर्शन 9 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील.

मुंबईतील जाहिरातींचे गजबजलेले जग तसेच गोव्यातील शांत किनारी गावे डेव्हिडच्या जीवनाचा भाग आहेत. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधर असलेले डेव्हिड मुंबई ते गोवा या मार्गावरील कथा आपल्या चित्रांमध्ये बहारीने मांडतात.

नेपथ्य आणि प्रदर्शनीय रचना यांचा त्यांचा सखोल अनुभव त्याच्या चित्रांमधील दृश्यबंध, परस्पेक्टिव्ह आणि कथनात्मकता यातून प्रत्ययाला येतो. अर्थात, भारतीय जाहिरात क्षेत्रातील अलेक पदमसी, गेर्सन दा कुन्हा, सिल्वेस्टर दा कुन्हा अशा दिग्गज निर्मात्यांबरोबर त्यांनी काम केले आहे हे विसरता कामा नये. 

‘कला’ त्याच्या जीवनाचा भाग बनण्याआधी डेविड त्याच्या शालेय आणि महाविद्यालयीन काळात गाजलेले हॉकीपटू आणि धावपटू होते. एका खेळाडूची ऊर्जा आणि शिस्त त्यांच्या कलात्मक निर्मितीतही प्रतिबिंबित होताना दिसते.

जेव्हा डेव्हिड गोव्यात कायमचे राहायला आले तेव्हा त्यांच्या सर्जनशील निर्मितीला अधिक वैयक्तिक वळण लाभले. थॉमस चेस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी टाइल पेंटिंग आणि लघुचित्रांचा अभ्यास केला आणि गोव्याच्या जीवनातील लयीमध्ये रुजलेली स्वतःची शैली लगेच विकसित केली.

Goa art exhibition, Majorda gallery event, Goan artist showcase
Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

मच्छीमार, त्यांच्या जाळी, शांत बॅकवॉटर, माड, किनाऱ्यावर पसरलेले शंख शिंपले त्यांच्या चित्रात अवतरू लागले. नॉस्टेल्जिया आणि उबदारपणा यांच्या खुणा असलेली त्यांची चित्रे लंडन, कॅनडा, न्यूयॉर्क आणि ऑस्ट्रेलिया येथील चित्र-संग्रहकांच्या संग्रहात सामील झाली आहेत. 

2018 मध्ये 'गोवन क्रेझी' या शीर्षकांच्या चित्रप्रदर्शनातून त्यांनी गोमंतकियांच्या दैनंदिन जीवनातील खेळकरपणा साजरा केला होता.‌

Goa art exhibition, Majorda gallery event, Goan artist showcase
Konkan Farming Culture: पावसाच्या सरी, मातीचे शिंतोडे... कोकणात 'भात लावणी'चा अनुभव घेताना जाणवतो जीवनाचा खरा गोडवा!

'फुटप्रिन्टस आणि फ्रेम्स' या प्रदर्शनाद्वारे डेव्हिड यांनी त्यांच्या कला प्रवासाला आकार देणाऱ्या अनेक सर्जनशील अध्यायांची उजळणी केली आहे- मुंबईत तसेच गोव्यात त्यांनी अनुभवलेले जग त्यांच्या चित्रांमध्ये प्रभावीपणे आले आहे.

डेव्हिड आता 77 वर्षांचे आहेत, मात्र कुतूहल आणि उत्सुकता हे त्यांचे गुण अजूनही तारुण्यात आहेत. त्यांचे प्रत्येक चित्र ही त्यांच्या स्मृतीची एक चौकट असते. 'मी श्रीमंतांसाठी नाही तर सामान्य माणसासाठी रंगवतो, जेणेकरून प्रत्येक घरात माझ्या चित्राचा एक तरी नमुना असेल', असे ते म्हणतात.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com