Restaurants In Goa: पर्यटकांसाठी राज्यातील हॉटेल पुन्हा सुरू

ऑगस्ट महिन्यामध्ये गोव्यात पर्यटकांची संख्या वाढेल आणि लसीकरण प्रमाणपत्रांच्या आधारे पर्यटकांना गोव्यात प्रवेशही मिळेल.
Restaurants In Goa
Restaurants In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

समुद्रकिनार्‍यावरील पर्यटक (Tourist) प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गोवा (Goa) राज्यात कोविड पॉझिटिव्हच्या (Covid-19) प्रकरणामध्ये लक्षणीय घट झाल्याने गोव्यातील हॉटेल्स (Hotels) पुन्हा एकदा उघडली गेली आहेत. राज्यातील कोविड पॉझीटीव्ह रूग्णांचा दर पाच टक्क्यांपेक्षा खाली आला आहे, परंतु नकारात्मक अहवालाशिवाय आणि लसीकरण (Vaccination) झाल्याशिवाय गोव्यात व्यावसायिक आणि पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही. (Foodies: Restaurants in Goa now open, check out the new rules)

Restaurants In Goa
Goa: COVID-19 नंतर राज्यात डेंग्यूचे संक्रमण; फोंड्यात आठ रुग्ण

TOI च्या वृत्तानुसार, ट्रॅव्हल आणि टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (TTAG) असे म्हणाले की, "पर्यटकांना गोव्यात प्रवेश द्यावा की नाही या निर्णयानंतरच गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या व्यवसायामध्ये वाढ होणार की नाही हे ठरणार. ऑगस्ट महिन्यामध्ये गोव्यात पर्यटकांची संख्या वाढेल आणि लसीकरण प्रमाणपत्रांच्या आधारे पर्यटकांना गोव्यात प्रवेशही मिळेल. ज्यांनी लस घेतली नाही, त्यांच्यासाठी कोविड-नकारात्मक अहवाल अनिवार्य केला जाऊ शकतो किंवा अशा पर्यटकांची गोव्यात कोरोना चाचणी घेतली जाऊ शकते. ऑक्टोबरपासून गोव्यात पर्यटकांची संख्या वाढते मात्र कोविडमुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली. मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पर्यटन हंगाम सुरू झाला असला तरी सर्व हॉटेल्स (Restaurants In Goa) सुरू नव्हती आणि केवळ 1400 हॉटेल व्यावसायीकांनी हॉटल्स सुरू केली होती. याव्यतिरिक्त, गेल्या 10 वर्षात राज्यात लहान हॉटेल्सचीही संख्या वाढली आहे परंतु आंतरराष्ट्रीय पर्यटक नसल्यामुळे त्यांचा सुद्दा व्यवसाय तोट्यात आहे."

Restaurants In Goa
Goa Covid-19: पुन्हा चिंता वाढली; कोरोनाचे सलग दुसऱ्या दिवशी पाच बळी

आता गोव्यात कोविड-19 ची प्रकरणे कमी झाली असल्याने गोव्यातील हॉटेल इंडस्ट्री हॉटेल्स सुरू करण्यात उत्सुक आहे. गोवा सरकारही सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्यात एंट्री देतील अशी आशा ओहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com