Goa Police: दिल्लीत प्रशिक्षणास गेलेल्या पोलिसांना अन्न विषबाधा

पाहणीसाठी पोलिस महानिरीक्षक बिश्नोई रवाना
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

पोलिस खात्यात भरती झालेल्या नवीन 500 कॉन्स्टेबलना प्रशिक्षणासाठी दिल्लीतील पोलिस अकादमीत पाठवले आहे. परंतु तेथे अनेकांना अन्न विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अकादमीचे स्वयंपाकघर अस्वच्छ असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन समस्येचे निवारण करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई दिल्लीला रवाना झाले आहेत.

गोवा पोलिस खात्याने या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. बिश्नोई यांनी आज नवी दिल्लीत प्रशिक्षण घेणाऱ्या गोवा पोलिसांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रात अस्वच्छतेचा आरोप केला होता.

त्यांनी अस्वच्छतेचे छायाचित्रही शेअर केले होते. एका प्रशिक्षणार्थ्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही केला होता. बिश्नोई यांनी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

विरोधामुळे मारहाण

भरती झालेल्या सुमारे 900 कॉन्स्टेबलपैकी 500 या आठवड्यात दिल्लीला पाठवले होते, तर उर्वरित वाळपई येथील राज्य पोलिस प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण घेत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अस्वच्छ शौचालये, उरलेले अन्न आणि अस्वच्छ मोकळी जागा दाखवली आहे. याला विरोध दर्शविला असता, तेथील प्रशिक्षकांनी मारहाण केल्याचा गोवा पोलिसांचा दावा आहे.

Goa Police
Mahadayi Water Dispute: अहो, माझ्या जीवनदायिनी मातेला वाचवा ना!

वातावरणाशी जुळवून घेणे कठीण

या अकादमीत एकाच वेळी लडाखमधील 109 आणि काही आयपीएसना प्रशिक्षण देण्यात येत आहे. लडाखमधील प्रशिक्षणार्थी सध्या उणे 16 अंश सेल्सिअस मधून 35 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या दिल्लीत आले आहेत. त्यांना वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी 20 दिवस लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com