गेल्या काही दिवसांपासून गोव्यातून कर्नाटक राज्यात होत असेलेल्या धान्य तस्करी प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. यावरुन आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन बोरकर पोलिसांच्या हाती लागला असून सध्या तो पोलिसांच्याच ताब्यात आहे.
(Food grain smuggling case Sachin Borkar’s plea postponed to Nov 30 )
सचिन बोरकर पोलिसांच्या ताब्यात आहे. आज त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. ही सुनावणी न्यायालयाने 30 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे गोमंतकीयांचे लक्ष लागुन राहिलेल्या या प्रकरणाच्या निकालासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मला अडकवण्यासाठी क्राईम ब्रँचवर राजकीय दबाव
अटकपूर्व जामीन अर्जावर दाखल करताना मुख्य आरोपी सचिन बोरकर यांनी आपल्याला अडकवण्यासाठी क्राईम ब्रँचवर राजकीय दबाव असल्याचं म्हटले होते. या प्रकरणात आपल्याला अडकवण्याचा राजकीय डाव आहे. त्यामुळे मला या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा असा युक्तीवाद केला होता.
क्राईम ब्रँचने मात्र जामीन देण्यासाठी विरोध करत शासकीय गोदामातून धान्य उचलले जात असल्याने, वेगवेगळ्या व्यक्तींनी एकत्र येत तयार केलेला हा कट आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी आणि धान्याच्या विक्रीतून मिळालेली रक्कम शोधण्यासाठी सचिन नाईकची चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी जामीन देण्याला क्राईम ब्रँचने विरोध केला होता. यावर आज सुनावणी पार पडली असून न्यायालयाने मुख्य आरोपीचा पोलिसांच्या ताब्यातील मुक्काम वाढवला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.