Gobi Manchurian Banned Goa : गोव्यात ‘गोबी मंच्युरियन'वर पुन्हा बंदी! 'एफडीए'चा निर्णय; अंमलबजावणीसाठी पालिकाही गंभीर

Nava Somvar Utsav in Bicholim : डिचोलीतील प्रसिद्ध ‘नवा सोमवार’च्या फेरीत ‘गोबी मंच्युरियन’च्या स्टॉलना बंदी घालण्याचा निर्णय अन्न आणि औषध खात्याने (एफडीए) घेतला असून, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. बंदीच्या या निर्णयाबाबतीत पालिकाही गंभीर आहे.
Gobi Manchurian Ban
Gobi Manchurian BanDainik Gomantak
Published on
Updated on

Gobi Manchurian Ban At Nava Somvar Utsav 2024 Bicholim Goa

डिचोली: डिचोलीतील प्रसिद्ध ‘नवा सोमवार’च्या फेरीत ‘गोबी मंच्युरियन’च्या स्टॉलना बंदी घालण्याचा निर्णय अन्न आणि औषध खात्याने (एफडीए) घेतला असून, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. बंदीच्या या निर्णयाबाबतीत पालिकाही गंभीर आहे.

गेल्यावर्षीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या निर्णयाची कडकपणे अंमलबजावणी होण्यासाठी ‘एफडीए’सह डिचोली पालिकेनेही पावले उचलली आहेत. बंदीचा निर्णय यशस्वी होण्यासाठी ‘एफडीए’सह पालिकेचे अधिकारी ‘नवा सोमवार’च्या फेरीवर यंदा लक्ष ठेवणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

Gobi Manchurian Ban
Nerul Accident: दुर्दैवी! कुत्रा आडवा आल्यामुळे युवकाने गमावला जीव; नेरूल येथील घटना

येत्या ९ रोजी डिचोलीतील प्रसिद्ध ‘नवा सोमवार’ साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.४) डिचोली पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई यांची भेट घेतली. ‘नवा सोमवार’च्या फेरीत ‘गोबी मंच्युरियन’चे स्टॉल उभे राहणार नाहीत. त्यादृष्टीने पालिकेने सहकार्य करावे, अशी सूचना ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी पालिकेला केली आहे.

Gobi Manchurian Ban
Sunburn 2024: ‘सनबर्न’च्या 'एनओसी'ला खंडपीठामध्ये आव्हान! पंचायतीला परवान्याची प्रत सादर करण्याचे निर्देश

‘नवा सोमवार’च्या फेरीत ‘गोबी मंच्युरियन’च्या स्टॉलना बंदी घालण्याचा निर्णय उत्सव समितीने आधीच जाहीर केला आहे. ‘एफडीए’च्या निर्णयाला डिचोली पालिकेचेही समर्थन आहे. ‘बंदी’च्या या निर्णयाची कडकपणे अंमलबजावणी झाली, तर यंदा उत्सवाला ‘गोबी’चे स्टॉल दिसण्याची शक्यता कमीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com