Tourist Surge in Fontainhas Prompts Calls for More Police
पणजी: येथील प्रसिद्ध फोंतेन्हास येथे होणारी पर्यटकांची गर्दी आणि त्यामुळे स्थानिकांना होणारा त्रास यावरून स्थानिक व पर्यटक यांच्यात वादाच्या घटना घडत आहेत. स्थानिकांनी याबाबत आमदार बाबुश मोन्सेरात यांच्याकडेही आपली समस्या मांडल्यानंतर या ठिकाणी दोन पोलिस तैनात करण्यात आले. परंतु येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असल्याने दोन पोलिसांची सेवा अपुरी पडते. पर्यटकांच्या संख्येनुसार पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरात शांतता भंग होत आहे. कचरा वाढत आहे. तसेच स्थानिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अडचणी येत आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून स्थानिकांनी पोलिसांची तैनाती करण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत येथे दोन पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. मात्र पर्यटकांची संख्या जास्त असल्याने दोन पोलिसांची संख्या अपुरी पडत आहे.
याबाबत आमदार बाबुश मोन्सेरात यांनी स्थानिकांच्या समस्यांकडे मी गांभीर्याने पाहतो. संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य तो उपाय शोधण्याचा आपला प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
फोंतेन्हास येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यात यावी. तसेच पर्यटकांसाठी निश्चित वेळा ठरवणे, कचरा व्यवस्थापन व्यवस्थित करणे आणि पार्किंगची सोय करणे यासारख्या उपाययोजनांची अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.