
पणजी: सोलापूर-गोवा विमानसेवेचा अखेर मुहूर्त ठरला. फ्लाय91ने बहुप्रतिक्षेत गोवा-सोलापूर दरम्यान थेट उड्डाण सुरु करण्याची घोषणा केली. या नव्या मार्गामुळे फ्लाय91 भारतातील एकूण आठ शहरांपर्यंत थेट विमानसेवा उपलब्ध करुन देणार असून यात महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग आणि आता सोलापूरचा समावेश केला आहे.
गोवा-सोलापूरदरम्यानची ही थेट विमानसेवा प्रवाशांसाठी अधिक जलद प्रवासाबरोबर आरामदायी आणि सुलभ करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गोवा-सोलापूर मार्गासाठी बुकिंग आता सुरु झाले असून तिकिटे फ्लाय91 च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. फ्लाय91 एक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचे सांगितले जात आहे. या विमानसेवेमुळे गोव्याच्या समृद्ध पर्यटनाला आणि सोलापूरच्या धार्मिक आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल.
दरम्यान, सोलापूर हे नैऋत्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून ते आपल्या समृद्ध कापड उद्योगासाठी आणि औद्योगिक विकासासाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सोलापूर हे धार्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सोलापूर हे पंढरपूर (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर), तुळजापूर (तुळजा भवानी मंदिर), अक्कलकोट (स्वामी समर्थ महाराज मंदिर),गंगापूर (श्री नरसिंह सरस्वती स्वामी मठ) आणि भीमाशंकर या पाच प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे सोलापूर हे औद्योगिक आणि धार्मिक वारशाचा संगम असलेले शहर आहे.
सोलापूर-गोवा विमानसेवेस पाठिंबा देण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, नागरी विमान वाहतूक महासंचालक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इतर सर्व भागधारकांचे फ्लाय91 ने आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.