Fly91 technical glitch
Fly91 technical glitchDainik Gomantak

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

Fly91 Goa Pune flight delay: धावपट्टीवर पोहोचल्यानंतर विमानात बिघाड झाल्याने प्रवाशांना विमानातून उतरवून पुन्हा एकदा सुरक्षा तपासणी करावी लागली
Published on

मोपा: मंगळवार (दि.२९) रोजी सकाळी उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर गोवा ते पुणे उड्डाण करणाऱ्या 'फ्लाय९१' (Fly91) विमानाला तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. धावपट्टीवर पोहोचल्यानंतर विमानात बिघाड झाल्याने प्रवाशांना विमानातून उतरवून पुन्हा एकदा सुरक्षा तपासणी करावी लागली, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित वेळेनुसार मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावरून पुण्याकडे जाण्यासाठी 'फ्लाय९१' चे विमान धावपट्टीवर पोहोचले. मात्र, उड्डाण करण्यापूर्वीच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. वैमानिकाच्या लक्षात ही बाब येताच, त्वरित खबरदारी म्हणून विमान थांबवण्यात आले.

सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. यानंतर, विमान कंपनीच्या नियमानुसार आणि सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, सर्व प्रवाशांना पुन्हा एकदा सुरक्षा तपासणी प्रक्रियेतून जाण्यास सांगण्यात आले. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रवाशांना काही काळ विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागला.

तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु विमान कंपनीच्या अभियांत्रिकी पथकाकडून तपासणी सुरू आहे. प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेबद्दल माहिती देण्यात आली असून, प्रवासाच्या पुढील नियोजनासाठी त्यांना सहकार्य केले जात आहे.

Fly91 technical glitch
Fly91 Monsoon Offer: जूनमध्ये तिकीट खरेदी करा, ऑगस्टपर्यंत प्रवास करा; फ्लाय91ची पावसाळी भेट, गोवा पर्यटनासाठी खास 'मॉनसून ऑफर'

मोपा ते लंडन विमानसेवेसाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनजवळील गॅटविक येथील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांना पत्र पाठवले आहे. विधानसभेत हा विषय उपस्थित झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com