Flower Festival: अनियमित पावसानंतरही ‘फुलोत्सव’

रानमाळही फुलले : रानतेरडा, उदरी कुसुंबी, गोवळी, पांढरी कोरांटी, सोनकीमुळे सृष्टीला झळाळी
flower festival
flower festivalDainik Gomantak

अनिल पाटील

राज्यात तब्बल १५ दिवस मान्सून उशिरा दाखल झाला, पण २३ जून ते २७ जुलैपर्यंत पावसाने आपला ८० टक्के कोटा पूर्ण केला. त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. २७ जुलैपासून आजअखेर केवळ चार दिवस वगळतात इतर दिवशी पावसाची गैरहजेरीच आहे.

flower festival
Kadamba Transport: ‘कदंब’च्या पहिल्या 23 बसेस भंगारात !

तरीही पूर्वी पडलेल्या पावसाच्या आधारे पश्चिम घाटातील जंगले, खाजगी वने आणि राखीव माळराने हिरवा शालू नेसून तयार झाली आहेत, त्यामुळे यंदाच्या फुलोत्सवाला सुरुवात झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात पावसाळा संपतो, तोच फुलोत्सव सुरू होतो.

फुलांची ही दुनिया अद्‌भुत असते. किती किती फुले, त्यांच्या तऱ्हाही तितक्याच, रंग, रूप, गंध, आकार, रचना, प्रत्येकाचे निराळे वैशिष्ट्य. काही रात्री फुलतात, तर काही दिवसा. काही सुवासिक तर... काही वास नसलेली... काही औषधी गुणधर्म असलेली, तर काही चक्क कीटकभक्षी. पिवळीधमक सोनकी आठ-पंधरा दिवस रंगाची मुक्तहस्ते उधळण करते.

पावसाळ्याच्या अखेरीस श्रावण- भाद्रपद महिन्यात येथील पर्वत पठारांवर, डोंगरमाथ्यावर उतारावर, कुठे खडकात फुललेल्या रानफुलांच्या रूपाने रंगांची उधळण सुरू असते. येथील सृष्टीने हिरवा शालू परिधान केलेला असतो.

हे सारे निसर्गाने गंधर्व किन्नरांची मैफल भरविल्यासारखे वाटते. नटखट-खोडकर वाऱ्यावर डोलणारी अगणित फुले जणू भोवतीने फेर धरून नाचत रानपऱ्यांच्या नृत्याच्या आविष्काराचा भास घडविताहेत, असे भासते. या गवतफुलाच्या सोबतीला सोनकीच्या पुष्पमळ्यांनी पठारे पीतवर्णी दिसतात.

flower festival
No parking in Bicholim: डिचोली शहरात पार्किंगची समस्या कायम

सोबत असते रानतेरडा, श्वेता रंगका, आभाळी युट्रेक्लोरिया, बालगोटी, सोनटिकली, लाजा, जांभळी मंजिरी, गोवळी, पांढरी कोरांटी, उदरी कुसुंबी... अशा आणखी कितीतरी फुलाची फुलकारांनी सृष्टीला झळाळी येते.

चार महिने पाऊस हवा!

यंदा पाऊस खूपच अनियमित पडला. याचा निसर्गावर विपरीत परिणाम होतो. कारण जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सलग आणि नियमित पाऊस पडेल, अशी अपेक्षा असते. मात्र एका महिन्यात पाऊस पडल्याने धरणात पाणी साठवले जाते. मात्र जंगलांवर, पिकांवर, जैवविविधतेवर याचा विपरीत परिणाम होतो. कारण त्यांना सलग चार महिने पाऊस पडणे गरजेचे असते., अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. रमेश कुमार यांनी दिली.

flower festival
Goa Fraud Case: मृत व्यक्तीचे बनावट मुखत्यारपत्र बनवून जमीन विकली; तिघांवर गुन्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com