शेतकऱ्यांना दिलासा! आधुनिक तंत्रज्ञानाने पाण्याखाली गेलेल्या शेतजमिनीला येणार 'नवी पालवी'

Drowned Farm: फा. क्वाद्रोस यांनी प्रथम ड्रोनच्या माध्यमाने नेमके काय नुकसान झाले आहे याचा सर्वप्रथम आढावा घेण्याचे काम हातात घेतले आहे
Drowned Farm: फा. क्वाद्रोस यांनी प्रथम ड्रोनच्या माध्यमाने नेमके काय नुकसान झाले आहे याचा सर्वप्रथम आढावा घेण्याचे काम हातात घेतले आहे
Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: बाणावलीतील तळेबांद भागातील भातशेती पावसामुळे पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान झाले आहे. दरम्यान, गोव्याचे पॅडी मॅन म्हणून ओळखले जाणारे फा. जॉर्ज क्वाद्रोस (Father George Quadros) यांनी या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

फा. क्वाद्रोस यांनी प्रथम ड्रोनच्या माध्यमाने नेमके काय नुकसान झाले आहे याचा सर्वप्रथम आढावा घेण्याचे काम हातात घेतले आहे. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शेत जमीन पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच या शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी कोणते उपाय करता येणे शक्य आहे याचाही अभ्यास करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी फा. क्वाद्रोस आपल्या पथकाबरोबर या शेत जमिनीत जाऊन पाहणी केली. नेमके कुठे, कसे व का नुकसान झाले याचा अभ्यास त्यांनी केला. पत्रकारांशी बोलताना फा. क्वाद्रोस यांनी ही शेत जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबद्दल दुःख व्यक्त केले. शेतकऱ्यांना यापुढे नुकसान होऊ नये म्हणून काय काय करता येईल याचा अभ्यास आम्ही करीत आहोत असे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या शेतजमिनीला नव्याने पालवी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Drowned Farm: फा. क्वाद्रोस यांनी प्रथम ड्रोनच्या माध्यमाने नेमके काय नुकसान झाले आहे याचा सर्वप्रथम आढावा घेण्याचे काम हातात घेतले आहे
Valpoi Agriculture : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केली जाते बियाण्यांची विक्री : विश्वनाथ गावस यांची माहिती

ड्रोनचा वापर करून खताची फवारणी करणार

ड्रोनचा वापर करून पूर्ण शेत जमिनीत युरिया खताचे फवारे मारणार आहोत. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकावर काही परिणाम होतो की नाही हे आम्हाला पहायचे आहे, असे त्याने सांगितले. या भागात पश्र्चिम बगल रस्ता बांधकाम सुरु आहे व त्याचा विपरीत परिणाम शेत जमिनीवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याकडे आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा आहे, मग प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे असे फादर क्वाद्रोस यांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com