मुसळधार पावसामुळे डोंगरी - नावेलीत 15 घरांमध्ये पाणी शिरले

आमदार उल्हास तुयेकर यांनी पुराचा फटका बसलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
Flood like situation in Goa
Flood like situation in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव ः काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नावेली मतदारसंघातील साळ नदीच्या उपनदीला पूर आल्याने डोंगरी व मांडप येथे 15 काही घरांत पाणी शिरले. नागमोडे - नावेली येथेही दुकानात व घरांत पाणी शिरण्याचा प्रकार घडला. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी पुराचा फटका बसलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना दिलासा देण्याची सूचना तुयेकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते व मलनिस्सारण महामंडळाच्या अभियंत्यांना केली. पाणी घरात व दुकानात शिरून झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित देण्याची सूचना तुयेकर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

काल संध्याकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दिकरपालहून मांडपच्या दिशेने वाहणाऱ्या साळ नदीच्या उपनदीला पूर आला असून डोंगरी व मांडप येथील काही घरांत पुराचे पाणी शिरल्याने बरेच नुकसान झाले.

Flood like situation in Goa
ओबीसींना आरक्षण न दिल्यामुळे उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल

डोंगरी येथील पूलही पाण्याखाली गेला. डोंगरी येथील लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून या या परिसरातील 15 घरांत पाणी शिरले आहे. मंदिराचे आवारही जलमय झाले आहे. चाररस्ता - नागमोडे येथे एका दुकानात व घरात पाणी शिरले.

तुयेकर यांनी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांसह भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. मामलेदार, तलाठी व स्थानिक नागरिक दीपक सावंत आणि दमोदर चव्हाण यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

bingson john conman arrested raipur
Goa Police Seniority Dispute Case
mandar surlakar murder case goa
goa archives department digitization
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com