...तर सत्तरीला महापुराचा तडाखा

सलग तीन वर्षे प्रलयकारी महापुराचा मोठा फटका लोकांना बसला; यंदाचे काय ?
flood
flood Dainik Gomantak

वाळपई : सत्तरी तालुक्यात 2019, 2020, 2021 साली सलग तीन वर्षे प्रलयकारी महापुराचा मोठा फटका लोकांना बसला होता. यात अनेकांच्या घरांच्या पडझड झाल्याने लोक बेघर झाले होते. उभी पिके आडवी होऊन शेतकऱ्यांनाही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षीही महापुराचा तडाखा बसणार नाही ना ? अशी शंका लोकांमध्ये निर्माण झाली आहे. ( flood hit the Sattari area )

सत्तरीत दरवर्षी मोठा पाऊस पडतो. पण, कधीच म्हादई नदीच्या पाण्याचा प्रवाह रस्त्यावर, बागायतीत, शेतात खुसले नव्हते. गेली तीन वर्षे मात्र महापुराने घरांना वेढले होते. म्हादईच्या पात्रात बांधलेले लहान बंधारे व त्यात वाहून येऊन अडकून राहणारी जंगली लाकडे, झाडे, नदीच्या पात्रात जमा झालेला मातीचा गाळ हे पुराचे मुख्य कारण होते. कर्नाटक राज्याने बांधलेले कळसा भांडुरा धरण, कालव्याचे पाणी मोठ्या पावसावेळी सोडले जाते असेही काहींचे मत होते.

flood
गोव्यात दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मत्स्य उत्पादनात वाढ

सलग तीन वर्षे जुलै, ऑगस्ट महिन्यात महापुराचा सामना करावा लागला होता. त्यात शेती, बागायती पिके पूर्णपणे नष्ट झाली होती. अनेकांची घरे कोसळली होती. म्हादई नदीच्या किनारी भागात सोनाळ, कडतरी, सावर्डे, कुडशे, वेळगे, खडकी, सावर्शे, तार, भिरोंडा, पाडेली, गुळेली, गांजे या पूर्ण पट्यात महापुराचा प्रलय लोकांनी अनुभवला आहे. सोनाळ, कडतरी गाव संपर्काबाहेर गेला होता, त्याच्या आठवणी लोकांच्या मनात अजूनही घर करून आहेत.

flood
रस्त्यांच्या सद्यस्थितीला कंत्राटदार जबाबदार : मंत्री काब्राल

उपाययोजना आखाव्यात

यावर्षी पाऊस लवकरच सुरू होण्याचे संकेत देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यावर उपाययोजना कोणत्या आखण्यात आल्या आहेत, हे दिसत नाही. सत्तरी तालुक्यात म्हादई नदीच्या पट्यातील गावेच या पुरात गेली तीन वर्षे अडकली आहेत. गतवर्षी साट्रे, बुद्रक करमळी, झर्मे अशा गावात डोंगर भूस्खननच्या घटना घडलेल्या आहेत. साट्रेच्या जंगली भागात सुमारे तीन चार किलो मीटर पर्यंत डोंगर कोसळलेले होते. त्यासाठी उपाय योजना, पुरामागील कारण मिमांसा तत्काळ झाली पाहिजे. नाहीतर हा प्रकार भविष्यातही असाच सुरू राहील, अशी भीती सत्तरीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com