Goa Congress: काँग्रेसतर्फे महिलांना पाच योजनांची ‘गॅरंटी’

Goa Congress: कॉंग्रेस पक्षाने सदोदित महिलांच्या सशक्तीकरणासाठी पाऊले उचलली आहेत.
Goa Loksabha Congress
Goa Loksabha CongressDainik Gomanatk

Goa Congress:

कॉंग्रेस पक्षाने सदोदित महिलांच्या सशक्तीकरणासाठी पाऊले उचलली आहेत. कॉंग्रेसने 2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महिलांसाठी 5 आश्‍वासने देल्याचे गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बिना नाईक यांनी सांगितले.

यावेळी लक्षी चौहान, जीना डायस उपस्थित होत्या. बिना नाईक म्हणाल्या, की ‘महालक्ष्मी’ योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक एक लाख रुपये, ‘आधी अबाधी पूरा हक्क’ अंतर्गत महिलांना 50 टक्के नोकऱ्या, ‘शक्ती का सन्मान’अंतर्गत अंगणवाडी, आशा आणि माध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट

Goa Loksabha Congress
Goa Accident Case: थिवी येथे अपघातात राजस्थानचा युवक ठार

‘अधिकार मैत्री’अंतर्गत महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी प्रत्येक पंचायतीमध्ये एक कायदेशीर साहाय्यक अधिकारी मित्र म्हणून नियुक्त केला जाईल. ‘सावित्रीबाई फुले वसतिगृह’ योजनेअंतर्गत नोकरदार महिलांसाठी संपूर्ण देशात वसतिगृहांची संख्या दुप्पट केली जाईल.

Goa Loksabha Congress
Lok Sabha Election 2024: गोव्यात 7 मे रोजी मतदान 11,7,328 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे

भाजपला दक्षिण गोव्यात योग्य उमेदवार मिळत नसल्याने महिला उमेदवार देणार असल्याचे सांगितले जाते, परंतु त्यांचा हा जुमला आहे. मला माध्यमांद्वारे अनेकदा उमेदवारीबाबत प्रश्‍न विचारले जात आहेत. सद्यस्थितीत दक्षिण गोव्यात आमच्या पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे बिना नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com